TRENDING:

Egg Recipe : फक्त एकच अंडं, त्यापासून 4 जणांचं जेवण कसं करायचं? अंड्याची भन्नाट रेसिपी

Last Updated:
How To Make Egg Recipe : ऑमलेट, अंडं उकडून त्याचे 4 तुकडे करून 4 माणसांना दिले तरी ते खाल्ल्याचं समाधान मिळणार नाही. त्यामुळे एका अंड्याचं ऑमलेट, हाफ फ्राय किंवा उकडून घेण्याचा विचार बिलकुल करू नका.
advertisement
1/5
फक्त एकच अंडं, त्यापासून 4 जणांचं जेवण कसं करायचं? अंड्याची भन्नाट रेसिपी
आज अंडा करी बनवते किंवा ऑमलेट, अंडा भुर्जी बनवते म्हणून तुम्ही फ्रिज उघडलं. अरे पाहतो तर काय फक्त एकच अंडं उरलं आहे आणि खाणारी माणसं 4. आता आणखी अंडी आणायला वेळही नाही. पण दुसरं काहीच नाही. मग एक अंडं 4 जणांना कसं पुरवायचं?
advertisement
2/5
ऑमलेट, अंडं उकडून त्याचे 4 तुकडे करून 4 माणसांना दिले तरी ते खाल्ल्याचं समाधान मिळणार नाही. त्यामुळे एका अंड्याचं ऑमलेट, हाफ फ्राय किंवा उकडून घेण्याचा विचार बिलकुल करू नका.  फक्त 1 अंडं असूनही 4 जणांसाठी पदार्थ बनवता येतो, फक्त ते मिक्स करून वाढवायचंय. अंड्याची फक्त चव येईल अशी मिक्स रेसिपी करा.
advertisement
3/5
जसं की 1 अंडं, 2 बारीक चिरलेले कांदे, 2 बारीक चिरलेले टोमॅटो, 2-3 लसूण पाकळ्या, एक चमचा तेल, मोहरी, जिरं, हळद, तिखट, मीठ, पाणी, कोथिंबीर इतकं साहित्य घ्या. कढईत तेल गरम करा, मोहरी–जिरे–हिंग, कांदा फोडणीला घाला.
advertisement
4/5
कांदा सोनेरी होईपर्यंत परता, लसूण आणि टोमॅटो घाला. हळद, तिखट, मीठ आणि पाणी घालून उकळी आणा. रस्सा जास्त ठेवा. एका वाटीत अंडं फेटून घ्या उकळत्या रश्शात हळूहळू ओता आणि सतत ढवळा. 2 मिनिटात आमटी तयार. वरून कोथिंबीर टाका.
advertisement
5/5
साधी डाळ तयार करा. त्यात शेवटी शेवटी फेटलेलं अंडं हळू ओता आणि ढवळत राहा. अंडा–डाळ मिक्स आमटी तयार. किंवा पिठात अंडं मिक्स करा आणि पोळी किंवा पराठा करून घ्या. याला अंड्याची चव येते. यामुळे प्रत्येकाला अंड्याची चव लागते आणि त्यातील प्रोटिनही मिळतं. चॅटजीपीटीने या रेसिपी सुचवल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Egg Recipe : फक्त एकच अंडं, त्यापासून 4 जणांचं जेवण कसं करायचं? अंड्याची भन्नाट रेसिपी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल