उन्हाळ्यात घोळणा फुटण्याचा धोका, रक्तस्त्राव टाळण्यासाठी पाहा घरगुती उपाय
- Published by:News18 Marathi
- Reported by:Latika Amol Tejale
Last Updated:
उन्हाळ्यात नाकातून रक्तस्त्राव होण्याची समस्या लहान मुलांमध्ये दिसते. तेव्हा योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते.
advertisement
1/7

उन्हाळ्यात अचानक नाकातून भळाभळा रक्त वाहू लागले, अशा प्रकारचा अनुभव आपल्यापैकी अनेकांना आला असेल. नाकातून रक्त येणे म्हणजे नाकाचा घोळणा फुटणे होय. उन्हाळ्यात ही समस्या सहसा लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते.
advertisement
2/7
लहान मूल बाहेर उन्हात खेळतंय आणि अचानक त्याच्या नाकातून रक्त वाहू लागतं. म्हणजेच अधिक उष्णतेमुळे त्याचा घोळणा फुटतो. अशा परिस्थितीत घाबरून न जाता नेमकं काय करावं ? याबाबत मुंबईतील आहारतज्ज्ञ आरती भगत यांनी माहिती दिलीय.
advertisement
3/7
उन्हाळ्यात उष्णतेमुळे घोळणा फुटण्याची समस्या अनेकांनी अनुभवली असेल. लहान मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. उष्णतेमुळे नाकातील पातळ त्वचा फाटली जाते. परिणामी नाकातून रक्त वाहायला सुरुवात होते. ही समस्या तात्पुरती असते. त्यामुळे या परिस्थितीत घाबरून जाण्याचे कारण नाही.
advertisement
4/7
घोळणा फुटला असेल तर सर्वप्रथम थंड पाणी डोक्यावर ओतावे. जेणेकरून रक्तस्त्राव त्वरित थांबण्यास मदत होते. पाणी ओतून किंवा थोडा वेळ नाकाची पुडी हाताने दाबून ठेवावी. तरी देखील रक्तस्त्राव थांबत नसेल तर जवळच्या डॉक्टरला लवकरात लवकर दाखवून घ्यावे.
advertisement
5/7
उन्हाळ्यात आपल्या रोजच्या आहारात व्हिटॅमिन-सी असलेल्या पदार्थांचा जास्त समावेश केला पाहिजे. लहान मुलांना लिंबू सरबत, ऑरेंज, मोसंबी हे फळ जास्त प्रमाणात खायला द्यावीत. जेणे करून उन्हाळ्यात त्यांना उष्णतेचा कुठलाही त्रास होणार नाही.
advertisement
6/7
आहारात व्हिटॅमिन-के, पोटेशियम असलेल्या भाज्यांचा देखील समावेश करावा. कारण या पालेभाज्या खाल्याने लहान मुलांची आतली त्वचेची लेयर मजबूत बनते.
advertisement
7/7
नाकाची पातळ स्किन मजबूत ठेवण्यासाठी मूग, मटकी असे कडधान्य खावे. शेवटी उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणे हा सर्व समस्यांवर एक रामबाण उपाय आहे, अशी माहिती आहारतज्ज्ञ आरती भगत यांनी दिली. (लतिका तेजाळे, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
उन्हाळ्यात घोळणा फुटण्याचा धोका, रक्तस्त्राव टाळण्यासाठी पाहा घरगुती उपाय