
मुंबईमध्ये महापिलिका निवडणुक जवळ आली आहे. त्यातच आता न्यूज 18 च्या 'बघतोय रिक्षावाला' या शो मध्ये मुंबईकरांनी आपली व्यथा मांडली आहे. महापालिकेत कोण बाजी मारणार ? याचा कल यावरुन समजतो.
Last Updated: Dec 29, 2025, 17:20 ISTछ.संभाजी नगरमधील शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी जागावाटपावरुन नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "युती मध्ये कमी जागा आहेत. पण त्यासगळ्या जागा निवडून येण्यासारख्या आहेत. मी स्वतः निवडणुक लढवणार नाही. एखादा चांगला कार्यकर्ता उभा करुन त्याला निवडून देऊ"
Last Updated: Dec 29, 2025, 19:16 ISTभंडारा जिल्ह्यात कोरंभी परिसरात एका पट्टेरी वाघांच दर्शन घडंलं आहे. काही नागरिक गोसेखुर्द धरणाकडे जात असताना त्यांना हा वाघ दिसला. त्यांनी प्रसंगावधानाने त्या वाघाचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे.
Last Updated: Dec 29, 2025, 18:23 ISTठाकरे बंधूंची युती झाल्यावर मनसेचा पहिलाच मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. ते म्हणाले, "महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी मुंबई महत्वाची आहे, त्यामुळे आपल्याला मुंबई वाचवायची आहे." असा संदेश राज ठाकरेंनी मेळाव्यात दिला.
Last Updated: Dec 29, 2025, 17:56 ISTबीड : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत उशिरा झोपणे ही अनेकांची सवय बनली आहे. मोबाईल, सोशल मीडिया, टीव्ही, ऑनलाइन काम किंवा मानसिक ताणतणाव यामुळे झोपेची नैसर्गिक वेळ मागे पडत आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, उशिरा झोपण्याचे दुष्परिणाम केवळ थकव्यापुरते मर्यादित नसून त्याचा थेट परिणाम शरीराच्या एकूण आरोग्यावर होत आहे. वेळेवर आणि पुरेशी झोप न घेतल्यास शरीरातील जैविक घड्याळ बिघडते आणि विविध आजारांची शक्यता वाढते, असे बीड येथील आरोग्य तज्ज्ञ राहुल वेताळ सांगतात.
Last Updated: Dec 29, 2025, 17:45 IST