हिवाळ्यात रोजच्या आहाराव्यतिरिक्त शरीराची प्रतिकारशक्ती चांगली राखण्यासाठी आणखी पोषक घटकांची आवश्यकता भासते. शरीर उबदार ठेवणं, शरीराला पुरेशी ऊर्जा देण्यासाठी एक त्रिकूट उपयुक्त ठरेल. या ऋतूत हळद, गूळ आणि काळी मिरी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.
Winter Exercises : थंडीत व्यायामांकडे दुर्लक्ष नको, घरी करता येतील हे व्यायाम
शास्त्रज्ञांनी या त्रिकुटाचा अभ्यास केला त्यातले निष्कर्ष खूप महत्त्वाचे आहेत. हळदीमधे अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, यामुळे शरीराला उबदारपणा आणि ऊर्जा मिळते.
advertisement
काळ्या मिरीमधे पाइपरिन नावाचा घटक असतो. यामुळे पचनसंस्थेला बळकटी मिळते आणि आपल्या शरीराला उबदारपणा मिळतो. गुळामधे लोह आणि इतर खनिजंही असतात.
त्यामुळे, हिवाळ्यात पचनसंस्था, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हे त्रिकूट महत्त्वाचं आहे.
Winter Care : हिवाळ्यात सांधेदुखी का वाढते ? जाणून घ्या कारणं आणि उपचार
दैनंदिन आहारात या तिन्ही गोष्टींचा समावेश करू शकता. चहा किंवा दुधात हळद आणि काळी मिरी घालू शकता. जेवणात गूळ देखील वापरू शकता.
हळद, गूळ आणि काळी मिरी वापरुन तयार केलेलं गरम पाणी हिवाळ्यात खूपच फायदेशीर आहे. यासाठी,एक कप दूध किंवा पाणी गरम करा. अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर काळी मिरी घाला. त्यात गूळ मिसळा आणि गरम गरम प्या.
