TRENDING:

'या' चुका टाळल्यास दीर्घकाळ चालेल फोनची बॅटरी! वर्षानुवर्षे राहील नवीकोरी

Last Updated:
फोनचा सातत्याने वापर केल्याने त्याची बॅटरी लाइफ कमी होते. मात्र काही चुका टाळल्यास बॅटरी नवीकोटी राहू शकते. चला या टिप्स कोणत्या पाहूया.
advertisement
1/6
'या' चुका टाळल्यास दीर्घकाळ चालेल फोनची बॅटरी! वर्षानुवर्षे राहील नवीकोरी
आपल्या आयुष्यात स्मार्टफोन एवढा महत्त्वाचा झाला आहे की, थोडा वेळही फोन हातत नसला की, काही तरी हरवल्यासारखं वाटतं. कारण आपण त्यावर खुप अवलंबून झालो आहोत. महत्त्वाची दैनंदिन काम आपण फोनद्वारेच करत असतो. त्याचा वाढता वापर पाहता, कंपन्यांनी फोनमध्ये मोठे बॅटरी पॅक देण्यास सुरुवात केली आहे, परंतु बॅटरी लाईफबद्दल चिंता अजूनही कायम आहे.
advertisement
2/6
काही काळ वापरल्यानंतर, बॅटरी लाईफ कमी होऊ लागते आणि वारंवार चार्जिंग वाढते. मात्र, काही चुका टाळून, तुम्ही वर्षानुवर्षे तुमच्या फोनची बॅटरी नवीनइतकीच चांगली ठेवू शकता. आज, आपण त्या टिप्सविषयी जाणून घेणार आहोत.
advertisement
3/6
बॅटरी पूर्णपणे चार्ज करण्याची चूक : बऱ्याच लोकांना त्यांच्या फोनची बॅटरी पूर्णपणे चार्ज करण्याची सवय असते. काही लोक फोन डिस्चार्ज आणि बंद केल्यानंतरच चार्ज करतात. दीर्घकाळ टिकणारी बॅटरी लाईफ सुनिश्चित करण्यासाठी, या दोन्ही चुका टाळा. खरं तर, बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज किंवा पूर्णपणे चार्ज करणे टाळणे महत्वाचे आहे. जर तुम्ही बॅटरी 100% चार्ज केली तर ती सेल्सवर जास्त भार टाकते, ज्यामुळे तिची क्षमता झपाट्याने कमी होते.
advertisement
4/6
खराब क्वालिटीच्या अॅक्सेसरीज वापरणे : कधीकधी, घाईघाईने किंवा पैसे वाचवण्याच्या लोभामुळे, लोक निकृष्ट दर्जाचे चार्जिंग केबल्स किंवा अॅडॉप्टर खरेदी करतात आणि त्यांच्याद्वारे त्यांचे फोन चार्ज करत राहतात. निकृष्ट दर्जाच्या अॅक्सेसरीज बॅटरी योग्यरित्या चार्ज होण्यापासून रोखतात, ज्यामुळे दीर्घकाळात त्याची कॅपेसिटी कमी होते.
advertisement
5/6
रात्री फोन चार्जिंगवर ठेवणे : बरेच लोक झोपण्यापूर्वी त्यांचे फोन चार्जिंगवर ठेवतात आणि नंतर सकाळी ते अनप्लग करतात. यामुळे बॅटरी लवकर खराब होते. खरं तर, सतत चार्जिंग केल्याने बॅटरीवर लक्षणीय परिणाम होतो आणि तिचे लाइफ कमी होते.
advertisement
6/6
ओव्हरहीटिंग करताना वापरणे : उन्हाळ्याच्या हंगामात जास्त गरम होण्याची समस्या विशेषतः सामान्य आहे. उच्च तापमानामुळे फोनच्या प्रोसेसर आणि इंटरनल पार्ट्समध्ये उष्णता निर्माण होते आणि जर फोन थंड होण्यापूर्वी वापरला गेला तर बॅटरीच्या केमिकल रिअॅक्शनवर परिणाम होतो, ज्यामुळे बॅटरीच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
'या' चुका टाळल्यास दीर्घकाळ चालेल फोनची बॅटरी! वर्षानुवर्षे राहील नवीकोरी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल