पण, थंडीपासून वाचण्यासाठी केलेला एक 'देसी जुगाड' मृत्यूला निमंत्रण देऊ शकतो, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. नैनितालमध्ये नुकतीच एक अशी हृदयद्रावक घटना घडली आहे, जी ऐकून कोणत्याही कार चालकाच्या अंगावर काटा येईल.
नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशातील मथुरा येथील मनीष गंधार हे व्यवसायाने टॅक्सी चालक होते. पर्यटकांना घेऊन ते नैनितालला गेले होते. डोंगरभागात कडाक्याची थंडी असल्याने मनीष यांनी रात्री आपली टॅक्सी सुखाताल पार्किंगमध्ये उभी केली. थंडीपासून वाचण्यासाठी त्यांनी एक भयानक निर्णय घेतला. त्यांनी कारच्या सर्व काचा बंद केल्या आणि गाडीच्या आतच कोळशाची शेकोटी पेटवून ठेवली. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत गाडीत काहीच हालचाल न दिसल्याने पार्किंगमधील कर्मचाऱ्यांना संशय आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कारची काच फोडली, तेव्हा मनीष बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
advertisement
बंद कारमध्ये किंवा छोट्या खोलीत कोळसा जाळणे हे थेट मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. यामागे एक वैज्ञानिक कारण आहे जे प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे आहे:
ऑक्सिजनची कमतरता: जेव्हा तुम्ही बंद कारसारख्या मर्यादित जागेत कोळसा जाळता, तेव्हा तिथला ऑक्सिजन वेगाने संपतो.
अपुऱ्या ऑक्सिजनमुळे कोळसा पूर्ण जळत नाही आणि त्यातून 'कार्बन मोनोऑक्साइड' (CO) हा अत्यंत विषारी वायू तयार होतो. या वायूला कोणताही वास नसतो किंवा तो डोळ्यांना दिसत नाही. त्यामुळे झोपलेल्या व्यक्तीला याची जाणीवच होत नाही की तो विषारी श्वास घेत आहे.
हा वायू फुफ्फुसाद्वारे रक्तात मिसळतो आणि शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा पूर्णपणे थांबवतो. यामुळे व्यक्ती आधी गाढ बेशुद्धीच्या स्थितीत जाते आणि नंतर श्वास गुदमरून तिचा मृत्यू होतो.
टॅक्सी चालक आणि प्रवाशांनी काय काळजी घ्यावी?
अनेकदा लांबच्या प्रवासात टॅक्सी चालक थंडीपासून वाचण्यासाठी गाडीतच शेकोटी पेटवतात किंवा बराच वेळ हीटर लावून काचा पूर्ण बंद करून झोपतात. हे अत्यंत धोकादायक आहे.
या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
1. बंद कारमध्ये कधीही कोळसा, मेणबत्ती किंवा कोणतीही ज्वलनशील वस्तू पेटवू नका.
2. जर तुम्हाला कारमध्ये झोपायचे असेल, तर किमान एक काच थोडी उघडी ठेवा जेणेकरून खेळती हवा (Ventilation) राहील.
3. हीटरचा वापर मर्यादित करा आणि झोपताना तो बंद ठेवा.
थंडीपासून वाचण्यासाठी आपण घेतलेली छोटीशी खबरदारी आपले प्राण वाचवू शकते. नैनितालची ही घटना आपल्या सर्वांसाठी एक मोठा धडा आहे. सुरक्षित राहा आणि हा संदेश तुमच्या ओळखीच्या सर्व ड्रायव्हर्सपर्यंत पोहोचवा.
