नंदापूर आणि कडवंची परिसरातील जवळपास सर्वच शेतकरी द्राक्ष शेती करतात. परंतु, कोविड काळात द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांवर नांगर फिरवला. नंदापूरचे संदीप उबाळे हे 2017 पासून द्राक्ष शेतीत आहेत. त्यामुळे कोविडनंतर लागलेल्या लॉकडाऊन आणि द्राक्ष बागायतदारांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ त्यांनी अनुभवले आहे. याच काळात त्यांनी एक प्लॉट काढून देखील टाकला. परंतु, दिवस टिकून राहत नाहीत. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना यंदा उभारू देणारे दर मिळत असल्याने संदीप उबाळे यांना एकरी तब्बल 10 लाख रुपयांचा नफा होत आहे.
advertisement
Success Story : नोकरीला केला रामराम, काकडी शेतीने उजळले नशीब, 3 लाख रुपयांचा निव्वळ नफा
उबाळे यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या तीन ते चार वाणांची द्राक्षे आहेत. त्यांचा सव्वा एकरचा एक प्लॉट 90 रुपये किलो दराने विक्री झाला असून त्यात त्यांना 150 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. तर दुसरा 30 गुंठे क्षेत्रातील द्राक्षांची 70 रुपये किलो दराने विक्री झाली असून यातून 90 क्विंटल उत्पादन मिळाले आहे. तर आणखी 3 एकराचा प्लॉट असून त्यात त्यांना 300 क्विंटल उत्पादन होणार आहे. अशा प्रकारे 5 ते 6 एकर द्राक्ष शेतीतून खर्च वजा जाता त्यांना 50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
शेतकरी बांधवांनी शेतीस जोडधंदा करू नये, तर शेतीच जोडधंदा म्हणून करावी. म्हणजे मुख्य उत्पन्नाचा स्रोत दुसरा असावा. शेती 99 टक्के निसर्गाच्या भरवशावर आहे. केवळ 1 टक्का आपल्या हातात आहे. त्यामुळे शेती करताना हवामान आणि पिकांचे योग्य नियोजन करावे, असा मोलाचा संदेश त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.





