भाजलेल्या बट्ट्यांना विदर्भात रोडगे म्हणतात. मराठवाड्यात देखील हा खास पदार्थ अत्यंत लोकप्रिय झाला आहे. दोन किलो जाडसर गव्हाचे पीठ, गरजेनुसार किंवा आवडीनुसार मका, रवा, दोन चमचे ओवा, तेल, रोडगे भाजण्यासाठी गोवऱ्या ईत्यादी अशा साहित्यांची आवश्यकता आहे.
कृती: सर्वप्रथम रोडगे भाजण्यासाठी चार ते पाच किलो गोवऱ्यांची भट्टी पेटवायची आहे. यासाठी तुम्ही जमिनीत छोटा खड्डा खोदू शकता. इकडे गव्हाचे, मकाचे पीठ आणि रवा एकत्र करून त्यात ओवा घालून घट्ट अशी कणीक मळून घ्यायची आहे. नरम पणा येण्यासाठी कणीक मळताना तेल वापरू शकता किंवा काहीजण दही वापरतात.
advertisement
कणेकेचे गोल गोल गोळे तयार करा. इकडे पेटवलेल्या गोवऱ्याचा मस्तपैकी विस्तव तोपर्यत तयार होईल. हे गोल गोळे या आहारावर व्यवस्थित भाजून घ्या . सर्व बाजून नीट भाजल्यानंतर रोडगे काढून घ्या. विस्तवात खोल जागा करून हे गोळे पुन्हा त्यात टाका आणि त्यावरून टोपले किवा पातेले झाकून ठेवा. किमान १० ते १५ मिनिटे असेच ठेवा.
यानंतर हे गोळे बाहेर काढून कपड्याने किंवा गोणपाटाने स्वच्छ करा. रेगुलर आपण करतो त्याप्रमाणे वरणाला आपल्या आवडीनुसार फोडणी द्या. रोडगे अनेकजण तुपात मॅरेनेट करून देखील वरणासोबत ताव मारतात. लिंबू कांदा झणझणीत तर्रीदार वरणासोबत या रोडग्यावर आपण ताव मारू शकता.