TRENDING:

Raigad: 'मंगेश आप्पा...' काळोखे यांच्या दोन्ही लेकींना पाहून खोपोलीकरांचे डोळे पाणावले, PHOTOS

Last Updated:
या कँडल मार्चमध्ये महेश काळोखे यांच्या दोन्ही मुली आणि इतर नातेवाईक सुद्धा सामील झाले होते. काळोखे यांच्या दोन्ही मुलींना पाहून उपस्थितींच्या डोळ्यात पाणी आलं होतं. (संतोष दळवी, प्रतिनिधी)
advertisement
1/7
Raigad: 'मंगेश आप्पा...' काळोखे यांच्या लेकींना पाहून खोपोलीकरांचे डोळे पाणावले,
राज्यात महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असताना रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे संपूर्ण रायगडमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आज या प्रकरणी खोपोलीमध्ये कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी काळोखे यांच्या दोन्ही मुली सहभागी झाल्या होत्या. दोन्ही मुलींना पाहून उपस्थितींचे डोळे पाणावले होते.
advertisement
2/7
खोपोलीत मंगेश काळोखे हत्येच्या निषेधार्थ कँडल मार्च आयोजित करण्यात आला होता. काळोखे यांच्या घरापासून ते पोलीस स्टेशनपर्यंत हा मार्च काढण्यात आला होता.
advertisement
3/7
या कँडल मार्चमध्ये महिला आणि मुली मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. कडेकोट पोलीस बंदोबस्त हा मार्च काढण्यात आला होता.
advertisement
4/7
हातात फलक घेऊन या महिला आणि मुली कँडल मार्चमध्ये सहभागी झाल्या होत्या. 'मंगेश अप्पाच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे', मंगेश आप्पा अमर रहे' असे फलक हातात घेऊन घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
advertisement
5/7
या कँडल मार्चमध्ये महेश काळोखे यांच्या दोन्ही मुली आणि इतर नातेवाईक सुद्धा सामील झाले होते. काळोखे यांच्या दोन्ही मुलींना पाहून उपस्थितींच्या डोळ्यात पाणी आलं होतं.
advertisement
6/7
यावेळी आमदार महेंद्र थोरवे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे आणि शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येनं सामील होते.
advertisement
7/7
त्यानंतर नंतर हा मार्च खोपोली पोलीस स्टेशनला पोहचला. तिथे सगळ्यांनी कँडला लावून काळोखे यांना आदराजंली वाहिली. काळोखे यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Raigad: 'मंगेश आप्पा...' काळोखे यांच्या दोन्ही लेकींना पाहून खोपोलीकरांचे डोळे पाणावले, PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल