TRENDING:

मधुमेह अन् हृदयविकाराचा असा टाळा धोका, रोज याच प्रमाणात खावा काजू

Last Updated:
उत्तम आरोग्यासाठी आहारात ड्रायफ्रुटचा समावेश केला जातो. पण रोजच्या आहारात काजू खाण्याचे प्रमाण काय असावे? याबाबत अनेकांना माहिती नसते.
advertisement
1/7
मधुमेह अन् हृदयविकाराचा असा टाळा धोका, रोज याच प्रमाणात खावा काजू
उत्तम आरोग्यासाठी आहारात ड्रायफ्रूट असणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. काजू हे सुद्धा असेच एक हेल्दी ड्रायफ्रूट आहे. त्याचा वापर विविध खाद्य पदार्थांमध्ये केला जातो. त्यामुळे त्या पदार्थाची चव जणू दुपटीने वाढते. पण काजूमध्ये असणाऱ्या पोषक तत्त्वांबाबत अनेकांना माहिती नसते. याबाबतच <a href="https://news18marathi.com/mumbai/">मुंबईतील</a> आहारतज्ज्ञ आरती भगत यांनी माहिती दिली आहे.
advertisement
2/7
काजूचे आरोग्यासाठी अनेक फायदे असून त्यात पोषक तत्त्वे असतात. पोटॅशियम, झिंक, फॉस्फरस, मॅग्नेशिअम आणि कॉपरची मात्रा काजूत मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे काजूचा रोजच्या आहारात समावेश केल्यास शरीराला फायदे मिळतात.
advertisement
3/7
फक्त आरोग्यच नाही तर त्वचा आणि डोळ्याच्या आरोग्यासाठी देखील काजू फायदेशीर ठरते. काजूतील पौष्टिक घटक शरीराला मिळावे यासाठी रिकाम्या पोटी काजू खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
advertisement
4/7
रोजच्या आहारात काजू खाण्याचे अनेक फायदे आहेत. शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली असल्यास काजू खाल्ल्याने ते नियंत्रणात राहते. कारण काजूमध्ये असंतृप्त चरबी (Unsaturted Fat) जास्त प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास ते मदत होते.
advertisement
5/7
काजूमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असल्यामुळे ते मधुमेह असलेल्या रुग्णासाठी फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे काजूमध्ये मॅग्नेशिअमचे प्रमाण असल्यामुळे हृदय निरोगी राहते. हाडे मजबूत राहतात. तसेच मेंदूलाही त्याचा फायदा होतो. स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका टळतो, असे आहारतज्ज्ञ सांगतात.
advertisement
6/7
कोणताही आहार हा शरीरासाठी प्रमाणात योग्य ठरतो. मात्र, अतिरेक झाल्यास त्याचे तोटेही सहन करावे लागू शकतात. काजूचा रोजच्या आहारात समावेश करण्यापूर्वी त्याचे प्रमाण किती असावे? ही बाब महत्त्वाची आहे.
advertisement
7/7
दिवसाला 4 ते 5 एवढेच काजू खावेत. कुठलेही तळलेले काजू किंवा मिठाचे काजू न खाता साधे काजू खावेत, अशी माहिती आहारतज्ज्ञ आरती भगत यांनी दिली आहे. (लतिका तेजाळे, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
मधुमेह अन् हृदयविकाराचा असा टाळा धोका, रोज याच प्रमाणात खावा काजू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल