Rice : भात चिकट होतो? काळजी करु नका 'या' सोप्या ट्रिक्सने नेहमी बनेल मोकळा भात
- Published by:Devika Shinde
Last Updated:
ताटात मऊ आणि मोकळा भात ताटात येत नाही, तोपर्यंत जेवणाची रंगत वाढत नाही. पण अनेकदा होतं काय, आपण खूप मन लावून भात लावतो आणि कुकर उघडला की दिसतो तो भाताचा गोळा किंवा चिकट झालेला भात.
advertisement
1/10

सकाळी उठल्यापासून आपल्या गृहिणींची धावपळ सुरू होते. कुकरच्या शिट्ट्या, डब्याची घाई आणि त्यात सगळ्यांची मनं जपताना आपली दमछाक होते. पानात कितीही छान भाजी आणि आमटी असली, तरी जोपर्यंत पांढराशुभ्र, मऊ आणि मोकळा भात ताटात येत नाही, तोपर्यंत जेवणाची रंगत वाढत नाही. पण अनेकदा होतं काय, आपण खूप मन लावून भात लावतो आणि कुकर उघडला की दिसतो तो भाताचा गोळा किंवा चिकट झालेला भात.
advertisement
2/10
"आज काय भात असा झालाय?" हे ऐकलं की मग गृहिणींचाही मूड जातो. कधी पाण्याचा अंदाज चुकतो, तर कधी घाईघाईत तांदूळ धुताना काहीतरी राहून जातं. पण काळजी करू नका, भात परफेक्ट होण्यासाठी काही रोकेट सायन्स पाळण्याची गरज नाही, फक्त काही साध्या गोष्टी लक्षात ठेवल्या तरी आपला भात हॉटेलसारखा दाणेदार आणि सुट्टा होईल.
advertisement
3/10
चला तर मग पाहूया, भात शिजवताना आपल्याकडून कोणत्या छोट्या चुका होतात.
advertisement
4/10
1. तांदूळ किती वेळा धुताय?आपल्याला सवय असते की नळ सोडून जोरात तांदूळ धुवायचे. पण तांदूळ खूप जास्त चोळून धुतल्याने त्यातील नैसर्गिक स्टार्च बाहेर येतो, ज्यामुळे भात चिकट होतो.तांदूळ हलक्या हाताने फक्त दोनदा धुवा. यामुळे त्यातील अनावश्यक कचरा निघून जाईल आणि स्टार्चही प्रमाणात राहील.
advertisement
5/10
2. भिजत घाला, घाई नकोकाही वेळेस आपण तांदूळ धुतल्या धुतल्या लगेच कुकरला लावतो. नवीन तांदूळ असेल तर तो लगेच चिकट होतो.शक्य असल्यास तांदूळ धुवून 15-20 मिनिटे बाजूला ठेवा. यामुळे तांदळाचा दाणा पाणी शोषून घेतो आणि शिजताना तो मोकळा होतो.
advertisement
6/10
3. पाण्याचा नेमका अंदाजहे तर सर्वात मोठं कोडे आहे!, शक्यतो भातासाठी 'एकास दोन' पाण्याचा अंदाज असतो, पण पाणी टाकूनही भात लगदा होतो. हे तांदळाच्या प्रकारावर अवलंबून असतं. जुना तांदूळ पाणी जास्त पितो, तर नवीन तांदूळ कमी पाण्यातही शिजतो.जर तुमचा भात रोज चिकट होतोय, तर अर्धा कप पाणी कमी करून पहा. जुन्या तांदळासाठी एक वाटी तांदळाला दोन वाट्या पाणी हे प्रमाण योग्य असतं.
advertisement
7/10
4. त्या दोन थेंब तेलाची जादूअनेकांना ही ट्रिक माहीत नसते. भात लावताना आपण त्यात मीठ तर टाकतो, पण तेल टाकायला विसरतो.कुकर लावण्यापूर्वी त्यात अर्धा चमचा तेल किंवा तूप आणि दोन-तीन थेंब लिंबाचा रस टाका. लिंबामुळे भात पांढराशुभ्र होतो आणि तेलामुळे भाताचे दाणे एकमेकांना चिकटत नाहीत.
advertisement
8/10
5. कुकर उघडण्याची घाईशिट्टी झाली की लगेच कुकर उघडून भात ढवळण्याची आपल्याला घाई असते. यामुळे वाफेमुळे मऊ झालेला भात तुटतो आणि त्याचा लगदा होतो.कुकरची वाफ पूर्णपणे जाऊ द्या. त्यानंतर झाकण उघडून भात लगेच न हलवता ५ मिनिटे तसाच राहू द्या. मग हलक्या हाताने काट्याने किंवा चमच्याने तो मोकळा करा.
advertisement
9/10
जर भात चिकट झालाच, तर काय करावं?समजा, चुकून भात चिकट झालाच, तर तो गरम असतानाच एका मोठ्या ताटात पसरवून ठेवा आणि त्यावर थोडं थंड पाणी शिंपडा. थोड्या वेळाने तो थोडा मोकळा व्हायला मदत होईल.
advertisement
10/10
स्वयंपाकघरात थोड्याफार चुका तर कोणाकडूनही होतात. कधी पाणी जास्त होईल तर कधी शिट्टी कमी पडेल. पण या छोट्या टिप्स वापरून पाहिल्या, तर तुमचा भातही अगदी लग्नाच्या पंगतीसारखा सुटसुटीत आणि चविष्ट होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Rice : भात चिकट होतो? काळजी करु नका 'या' सोप्या ट्रिक्सने नेहमी बनेल मोकळा भात