Winter Skin Care Tips: हिवाळ्यात ‘अशी’ घ्या त्वचेची काळजी, त्वचा राहील कोमल आणि मुलायम
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Winter Skin Care: हिवाळ्यात बदललेल्या वातावरणाचा फटका अनेकांना बसतो. काही जण आजारी पडतात तर काही जणांना त्वचा विकारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे ज्यांची त्वचा कोरडी किंवा शुष्क आहे त्यांना हिवाळ्यात फारच काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी या काही टिप्स्.
advertisement
1/7

हिवाळ्यात आपल्याला तहान कमी लागते त्यामुळे आपण पाणी कमी पितो. हे आपल्या त्वचेसाठी घातक आहे. वाढलेल्या थंडीमुळे त्वचा कोमल ठेवण्यासाठी पाण्याची म्हणजेच शरीर हायड्रेटेड राहण्याची गरज आहे. त्यामुळे तुम्ही हिवाळ्यात पुरेशा प्रमाणात पाणी प्यायलात तर तुम्ही त्वचा कोरडी पडणार नाही.
advertisement
2/7
रोज सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम चेहरा कोमट पाण्याने धुवा. कारण थंड पाण्याने चेहरा धुतला तर त्वचा कोरडी पडते. चेहरा धुताना साबणाऐवजी फेसवॉशचा वापर करा. गुलाबपाणी आणि ग्लिसरीन असलेलं क्रिम हिवाळ्यात त्वचेसाठी फायद्याचं ठरू शकतं. यामुळे त्वचा मुलायम आणि हायड्रेट राहायला मदत होईल.
advertisement
3/7
उन्हाळ्याप्रमाणे हिवाळ्यात सनस्क्रीन लोशन किंवा क्रिम लावणं फायद्याचं ठरतं. यामुळे त्वचेचा गारठ्यापासून बचाव होतो. त्वचा हायड्रेट करण्यासाठी तुम्ही लव्हेंडर ऑईल, खोबरेल तेल अशा तेलांचा वापरही करू शकता.
advertisement
4/7
हिवाळ्यात आंघोळ करताना शरीराला जास्त घासू नका. तसंच आंघोळीनंतर त्वचेला मॉइश्चरायझर किंवा तेल लावावं, त्यामुळे त्वचा कोमल आणि मुलायम राहायला मदत होईल.
advertisement
5/7
हिवाळ्यात त्वचेप्रमाणे ओठही कोरडे पडून त्यांना भेगा पडतात.कधीकधी तर या भेगा इतक्या वाढतात की ओठातून रक्त यायलं लागतं. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांना तूप लावून झोपा यामुळे ओठ कोरडे पडणार नाहीत.
advertisement
6/7
व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र व्हिटॅमिन सी हे त्वचेसाठीसुद्धा खूप फायद्याचं आहे. त्यामुळे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी युक्त आहार किंवा संत्री, आवळ्यासारखी फळं खाणं फायदेशीर ठरू शकतं.
advertisement
7/7
डेड स्किन म्हणजेच मृत त्वचा काढून टाकण्यासाठी स्क्रबरचा वापर करा. यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून क्लिनझींग मिल्कने हलक्या हाताने मसाज करा. त्यामुळे त्वचा कोरडी पडून भेगा पडण्याच प्रमाण कमी होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Winter Skin Care Tips: हिवाळ्यात ‘अशी’ घ्या त्वचेची काळजी, त्वचा राहील कोमल आणि मुलायम