TRENDING:

चीनचा सोन्यावर मोठा 'डाव', गोल्ड मार्केट अस्थिर; गुंतवणूकदारांसाठी धोक्याचा इशारा, जगाची नजर अमेरिकेवर

Last Updated:

Gold Market: चीनच्या सेंट्रल बँकेने सलग 15व्या महिन्यात सोने खरेदी केल्याने जागतिक गोल्ड मार्केटमध्ये अस्थिरता वाढली आहे. या हालचालींचा थेट परिणाम भारतीय गुंतवणूकदारांवर होण्याची शक्यता असून सोन्याच्या किमतींबाबत सावधगिरीचा इशारा दिला जात आहे.

advertisement
बीजिंग: चीनच्या सेंट्रल बँकेने सलग 15व्या महिन्यात सोने खरेदी केल्याची अधिकृत पुष्टी केल्यानंतर जागतिक आर्थिक बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. पीपल्स बँक ऑफ चायना (PBoC) च्या ताज्या आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्यातही चीनने आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सच्या माहितीनुसार जानेवारीअखेर चीनकडे असलेला सोन्याचा साठा 74.19 मिलियन फाइन ट्रॉय औंस इतका झाला असून, डिसेंबरअखेर हा साठा 74.15 मिलियन ट्रॉय औंस होता. म्हणजेच अल्प प्रमाणात का होईना, पण चीनने सोने खरेदीची मालिका अखंडपणे सुरू ठेवली आहे.
News18
News18
advertisement

सोन्याच्या साठ्याच्या किमतीत मोठी झेप

फक्त सोन्याच्या प्रमाणातच नव्हे, तर त्याच्या एकूण किमतीतही लक्षणीय वाढ झाली आहे. जानेवारीच्या अखेरीस चीनच्या गोल्ड रिझर्व्हचे एकूण मूल्य तब्बल 369.58 अब्ज डॉलर इतके झाले आहे. यापूर्वी डिसेंबरमध्ये हा आकडा 319.45 अब्ज डॉलर इतका होता. म्हणजेच अवघ्या एका महिन्यात सोन्याच्या साठ्याच्या किमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. जागतिक पातळीवर आर्थिक अस्थिरता, भू-राजकीय तणाव आणि चलनांवरील दबाव वाढत असताना चीनकडून सोने साठवण्यावर दिला जाणारा भर अनेक अर्थतज्ज्ञांचे लक्ष वेधून घेत आहे.

advertisement

सोन्याच्या किमतींमध्ये प्रचंड चढ-उतार

सोने हे पारंपरिकपणे सुरक्षित गुंतवणूक (सेफ हेवन) मानले जाते. जानेवारी महिन्यात सट्टेबाजी आणि गुंतवणूकदारांच्या वाढत्या मागणीमुळे सोन्याच्या किमतींनी जोरदार उसळी घेतली होती. या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर जवळपास 5,600 डॉलर प्रति औंस या ऐतिहासिक उच्चांकापर्यंत पोहोचला. मात्र ही तेजी फार काळ टिकली नाही. जानेवारीच्या अखेरीस अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या पुढील अध्यक्षपदासाठी केविन वार्श यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर बाजारातील वातावरण बदलले आणि स्पॉट गोल्डच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली.

advertisement

आजचा सोन्याचा दर

सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर घसरून 4,403.24 डॉलर प्रति औंसपर्यंत खाली आला. त्यानंतर काही प्रमाणात रिकव्हरी दिसून आली असून, सध्या सोन्याचा दर सुमारे 4,960 डॉलर प्रति औंसच्या आसपास व्यवहार करत आहे. या तीव्र चढ-उतारांमुळे जागतिक गोल्ड मार्केटमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

चीनमधील सोन्याची खपत घटली

चीनमध्ये सोन्याच्या एकूण खपाबाबत बोलायचे झाल्यास, सलग दुसऱ्या वर्षी त्यात घट नोंदवण्यात आली आहे. राज्य समर्थित चायना गोल्ड असोसिएशनच्या आकडेवारीनुसार 2025 मध्ये चीनची एकूण गोल्डचा वापर 3.75 टक्क्यांनी घटून 950 मेट्रिक टनांवर आली आहे. दागिन्यांची मागणी आणि औद्योगिक वापरात काही प्रमाणात घट झाल्याचे यामागचे प्रमुख कारण मानले जात आहे.

advertisement

गोल्ड बार आणि कॉइनची मागणी मात्र वाढली

एकीकडे एकूण सोन्याची खपत कमी होत असली, तरी दुसरीकडे सुरक्षित गुंतवणुकीचे प्रतीक असलेल्या गोल्ड बार आणि कॉइनच्या खरेदीत मोठी वाढ झाली आहे. 2025 मध्ये गोल्ड बार आणि कॉइनची खरेदी 35.14 टक्क्यांनी वाढली असून, सध्या ही खरेदी चीनच्या एकूण सोन्याच्या खपाच्या निम्म्याहून अधिक हिस्सा व्यापत आहे. यावरून गुंतवणूकदारांमध्ये सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल स्पष्टपणे दिसून येतो.

advertisement

चीनची सोने खरेदीची रणनीती

महत्त्वाची बाब म्हणजे पीपल्स बँक ऑफ चायनाने मे 2024 मध्ये सलग 18 महिने सुरू असलेली सोने खरेदीची मालिका थांबवली होती. मात्र त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच चीनने पुन्हा एकदा सोने खरेदी सुरू केली. त्यामुळे डॉलरवरील अवलंबित्व कमी करणे, परकीय चलन साठा अधिक सुरक्षित बनवणे आणि भविष्यातील आर्थिक धक्क्यांना तोंड देण्यासाठी चीन सोने साठवण्यावर भर देत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

मराठी बातम्या/मनी/
चीनचा सोन्यावर मोठा 'डाव', गोल्ड मार्केट अस्थिर; गुंतवणूकदारांसाठी धोक्याचा इशारा, जगाची नजर अमेरिकेवर
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल