TRENDING:

तो लॉज आणि 120 नंबरची खोली, तरुणाचे टोकाचं पाऊल, सोलापुरात खळबळ

Last Updated:

सोलापूर शहरातील भाग्यलक्ष्मी लॉजमध्ये आज सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर : शहरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली असून प्रेमप्रकरणातील तणावातून एका तरुणाने लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सोलापूर शहरातील भाग्यलक्ष्मी लॉजमध्ये आज सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
News18
News18
advertisement

मृत तरुणाचे नाव हरीश भास्कर बंडी (वय 29, रा. नीलम नगर, सोलापूर) असे आहे. शिवाजी महाराज चौक ते संभाजी महाराज चौक रस्त्यावरील आंबेसेटर हॉटेलजवळ असलेल्या भाग्यलक्ष्मी लॉजच्या दुसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक 120 मध्ये आज सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

APMC Market: डाळिंबाची आवक दबावात, केळीचे दर वाढले, आल्याची काय स्थिती?

advertisement

नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हरीश बंडी यांचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. दोन्ही कुटुंबीयांकडून लग्नाबाबत चर्चा करण्यात आली होती; मात्र मुलीच्या आई-वडिलांनी या लग्नास नकार दिल्याने हरीश मानसिक तणावात होता. याच तणावातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

दिनांक 4 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी हरीश घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर तो परत न आल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. शोध सुरू असतानाच आज त्याचा मृतदेह लॉजच्या खोलीत आढळून आला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, तूर आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर रुग्णालयात नातेवाइक व मित्रांनी मोठी गर्दी केली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे.

मराठी बातम्या/क्राइम/
तो लॉज आणि 120 नंबरची खोली, तरुणाचे टोकाचं पाऊल, सोलापुरात खळबळ
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल