advertisement

मस्करीची झाली कुस्करी, एकाचा जीव गेला, दोघे जखमी, कोल्हापुरात भयंकर घडलं

Last Updated:

Kolhapur News: या घटनेचे वृत्त समजताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे तीन पोलीस अधिकाऱ्यांसह 25 हून जादा पोलीस तैनात करण्यात आले होते.

मस्करीची झाली कुस्करी, एकाचा जीव गेला, दोघे जखमी, कोल्हापुरात भयंकर घडलं
मस्करीची झाली कुस्करी, एकाचा जीव गेला, दोघे जखमी, कोल्हापुरात भयंकर घडलं
कोल्हापूर: मस्करी करणं एकाच्या जीवावर बेतल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात घडला आहे. आजरा शहरात भरवस्तीत मस्करीच्या रागातून तरुणाचा खून करण्यात आला. महम्मदकैफ साजीद खतीब असे 24 वर्षीय मृताचे नाव आहे. तर समीर अब्दुल गफार तकिलदार व आतिफ इस्माईल हिंग्लजकर हे जखमी झाले आहेत.
आजरा येथे बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नाईक गल्ली येथील मकरज मशीद समोर काही तरुण एकत्र जमले होते. सुरुवातीला वेगवेगळ्या विषयांवरून त्यांच्यात थट्टा मस्करी सुरू होती. याच मस्करीवरून त्यांच्यात वाद सुरू झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यावेळी अरकम लमतुरे याने आपल्याकडील चाकू काढून मृत महम्मदकैफसह समीर तकिलदार आणि आतिफ हिंग्लजकर यांच्यावर वार करण्यास सुरुवात केली. तर अबू सुफियान व शकील यांनी देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
advertisement
या प्रकरणात पोलिसांनी मुख्य संशयित अरकम महम्मद लमतुरे, अबू महम्मद लमतुरे, साकीब हसनअली खेडेकर या तिघांना ताब्यात घेतले आहे. मृत महम्मदकैफच्या नातेवाईक व मित्र परिवाराने संशयित अरकम याच्या घरावर दगडफेक केली. तसेच दुचाकीची तोडफोड केली. या घटनेची नोंद आजरा पोलिसांत झाली आहे.
advertisement
दरम्यान, या घटनेचे वृत्त समजताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे तीन पोलीस अधिकाऱ्यांसह 25 हून जादा पोलीस तैनात करण्यात आले होते. या प्रकरणात पुढील कारवाई सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
मस्करीची झाली कुस्करी, एकाचा जीव गेला, दोघे जखमी, कोल्हापुरात भयंकर घडलं
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement