Shocking Incident : मुंबईत पाऊल ठेवलं अन् नशिबाने फिरवली पाठ, राजस्थानच्या बाप-लेकीसोबत CSMT स्थानकात घडलं भयंकर
- Published by:Tanvi
- local news desk
Last Updated:
CSMT Station Shocking News : गेल्या काही दिवसांपूर्वी सीएसएमटी स्थानकात एक भयंकर कांड समोर आले होते आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. नक्की काय घडलं आणि यात पुढे काय झालं त्याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या.
मुंबई : मुंबई शहर हे कायम स्वप्ननगरी म्हणून मानले जाते. देशभरातून लोक मुंबईत येत असतात आणि त्यांची स्वप्न पूर्ण करुन पुढे जात असतात. मात्र, राजस्थानवरुन मुंबईत आलेल्या एका सराफा व्यापाऱ्याला आणि त्याच्या मुलीला इथं येण हे आयुष्यभराची जखम देऊन गेलं आहे.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मुळचे राजस्थानमधील असलेले एक तक्रारदार कमलकुमार सोनी हे एक सराफा व्यापारी आहेत. ते 1 ऑगस्ट रोजी त्यांच्या 7 वर्षांच्या मुलीसह सोन्याच्या एका प्रदर्शनासाठी मुंबईत आले होते. तेव्हा त्यांच्याकडे 14 ग्रॅम शुद्ध सोन्याचा तुकडा तसेच 31,9000 एवढी रोख रक्कम होती. नंतर ते 10 ऑगस्ट रोजी पुन्हा त्यांच्या घरी जाण्यासाठी निघाले. तेव्हा ते साधारण रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबई सेंट्रल स्थानकावर पोहोचले. स्थानकावर पोहोचताच सोनी तिथे एका रेल्वे पोलिसाने अडवले.
advertisement
रेल्वे पोलिसांनी अडवल्यानंतर सोनी यांची बॅक तपासली. काही वेळात आणखी दोन रेल्वे पोलिस तेथे आले. तपासणी दरम्यान त्या पोलिसांना सोनी यांच्या बॅगेत सोन्याचा तुकडा आणि काही रोख रक्कम आढळली. तेव्हा त्या पोलिसांनी सोनी यांना जाब विचारला पण त्या सोन्याच्या पावत्या असल्याचे सांगूनही पोलिसांनी त्यांना मुलीसमोर शिवीगाळ करत मारहाण केली आणि प्लॅटफॉर्मजवळच्या एका अंधाऱ्या रुममध्ये नेत दमदाटी करत अटक करण्याची धमकी दिली.
advertisement
घाबरलेल्या अवस्थेत सोनी आणि त्यांच्या मुलीने पोलिसांना सोडण्याची विनंती केली तरी देखील रेल्वे पोलिसांनी त्यांना सोडले नाही. पण काही वेळात रेल्वे सुटण्याची वेळ झाल्याने तसेच सोन्याचा तुकडा परत देऊन बॅगेतली रोख रक्कम घेऊन त्या पोलिसांनी त्यांना सोडून दिले.
अखेर पोलिस स्थानकात तक्रार
सोनी यांनी राजस्थानला पोहोचल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानंतर हे प्रकरण तेथून मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांकडे देण्यात आले. पोलिसांनी तातडीने यावर कारवाई करत या प्रकरणाचा तपास सुरु केला. त्यात पुढे या प्रकरणाती आरोपी तीन रेल्वे पोलिसांना निलंबित करण्यात आले. त्या निलबणात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलसी ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक ललित जगताप, हवालदार राहुल भोसले आणि अनिल राठोड यांचा समावेश आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 12:46 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Shocking Incident : मुंबईत पाऊल ठेवलं अन् नशिबाने फिरवली पाठ, राजस्थानच्या बाप-लेकीसोबत CSMT स्थानकात घडलं भयंकर









