Sprouted Onion : कोंब आलेला कांदा खाल्ला तर चालतो का? तुम्ही तो भाग कापून वापरण्याचा विचार करत असाल तर आधी हे वाचा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Is it safe to eat sprouted onions : काय करायचा हा कांदा? हा खायचा की नाही? तो कोंब कापून टाकून खाल्ला तर चालतो का? खाल्लं तर काय होईल आणि नाही खाल्लं तर वाया जाईल, मग करायचं तरी काय? असे प्रश्न अनेकांना पडतात
advertisement
1/8

कांदा हा प्रत्येक घरातील महत्वाचा पदार्थ आहे, अगदी वेज पदार्थापासून ते नॉनवेजपर्यंत सगळ्या गोष्टींसाठी कांदे लागतात. कांद्या शिवाय जेवणाला चवच नाही. त्यामुळे कांदा नसेल तर चमचमीत आणि मसालेदार पदार्थाची तुम्हाला चव ही मिळणार नाही. त्यामुळे अनेक घरात लोक कांदे एकदाच जास्तीचे विकत घेतात. पण अनेकदा होतं काही कांद्यांला हळूच हिरवा कोंब बाहेर आलेला दिसतो. अशावेळी गृहिणींच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्मात होतात.
advertisement
2/8
काय करायचा हा कांदा? हा खायचा की नाही? तो कोंब कापून टाकून खाल्ला तर चालतो का? खाल्लं तर काय होईल आणि नाही खाल्लं तर वाया जाईल, मग करायचं तरी काय?
advertisement
3/8
स्वयंपाकघरातल्या छोट्या छोट्या गोष्टींच टेन्शन गृहिणीं येतं. बटाट्याला मोड आले तर आपण ते फेकून देतो, मग कांद्याचं काय? तो विषारी असतो का? की त्याची चव बदलते? चला तर मग, तुमच्या या मनातील प्रश्नाचं उत्तर शोधूया.
advertisement
4/8
कोंब आलेला कांदा खाणं सुरक्षित आहे का?तर याचं सोपं उत्तर आहे. हो, नक्कीच कांद्याला आलेले हिरवे कोंब मुळीच विषारी नसतात. खरं तर, कांदा जेव्हा जुना होतो आणि त्याला थोडा ओलावा मिळतो, तेव्हा तो पुन्हा रुजण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून ही हिरवी पात बाहेर येते. ही पात म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपण आवडीने खातो ती 'कांद्याची पातच' आहे.
advertisement
5/8
पण... चवीमध्ये काय फरक पडतो?कांदा खाणं सुरक्षित असलं तरी, त्याच्या गुणधर्मात काही बदल नक्कीच होतात: 1. मऊपणा: जेव्हा कांद्यातून कोंब बाहेर येतो, तेव्हा कांद्यातील सर्व पोषण आणि साखर त्या कोंबाला वाढवण्यासाठी वापरली जाते. यामुळे तो कांदा आतून थोडा मऊ किंवा 'पचपचीत' होऊ लागतो. 2. कमी गोडवा: नेहमीच्या कांद्यासारखा गोडवा किंवा कुरकुरीतपणा अशा कांद्यात नसतो. 3. कडवटपणा: काही वेळा कोंब आलेल्या कांद्याची चव थोडी कडवट वाटू शकते.
advertisement
6/8
अशा कांद्याचा वापर कसा करावा?1. कोंब फेकू नका: तो हिरवा भाग बारीक चिरून तुम्ही भाजी किंवा आमटीत वापरू शकता. त्यात व्हिटॅमिन सी भरपूर असतं.2. मधला भाग काढा कांदा कापल्यावर जो मधला पिवळसर भाग असतो, तो काढून टाका आणि उरलेला कांदा वापरा.3. कच्चा खाणं टाळा: असा कांदा सॅलडमध्ये कच्चा खाण्यापेक्षा, फोडणीत किंवा भाजी शिजवताना वापरणं जास्त चांगलं लागतं.
advertisement
7/8
एक महत्त्वाची खबरदारी (जी आपण अनेकदा विसरतो)कांद्याला कोंब येणं ठीक आहे, पण जर कांदा दाबल्यावर खूपच नरम किंवा मऊ लागत असेल, त्यातून पाणी येत असेल किंवा त्याला काळपट बुरशी लागली असेल, तर मात्र तो कांदा वापरू नका. बुरशी लागलेला कांदा आरोग्यासाठी घातक ठरू शकतो.
advertisement
8/8
सख्यांनो, कांद्याला मोड आले म्हणजे तो फेकायची गरज नाही. महागाईच्या काळात अन्नाची नासाडी का करायची? फक्त तो कांदा कापून नीट तपासा आणि बिनधास्त वापरा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Sprouted Onion : कोंब आलेला कांदा खाल्ला तर चालतो का? तुम्ही तो भाग कापून वापरण्याचा विचार करत असाल तर आधी हे वाचा