New Year Wishes : तुमच्या भाऊ बहिणीच्या आयुष्यात घेऊन येवो आनंद-यश! या शुभेच्छांनी साजरं करा नववर्ष
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
New Year wishes for brother and sister : भाऊ-बहिणीचं नातं म्हणजे प्रेम, जिव्हाळा, भांडणं आणि आपुलकी यांचं सुंदर मिश्रण असतं. आयुष्यात कितीही बदल झाले, कितीही अंतर पडलं तरी हे नातं नेहमीच घट्ट राहातं. नववर्षाच्या निमित्ताने भाऊ-बहिणी एकमेकांना मनापासून शुभेच्छा देतात. कारण या शुभेच्छांमध्ये केवळ शब्द नसतात तर काळजी, पाठिंबा आणि उज्ज्वल भविष्यासाठीची प्रार्थना असते. येणारं नववर्ष दोघांच्याही आयुष्यात आनंद, यश, आरोग्य आणि नवीन आठवणी घेऊन येवो, हाच या खास नात्याचा खरा अर्थ आहे.
advertisement
1/7

नवं वर्ष घेऊन येवो हसऱ्या आठवणींची शिदोरी, भाऊ-बहिणीचं नातं राहो नेहमी प्रेमाने भरलेली गोष्ट गोडी.. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
2/7
भांडणातली मस्ती, आठवणींची साथ, नववर्षातही तुझा हात माझ्या हातातच राहो, भाऊ-बहिणीचा नातं हे खास.. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
3/7
तुझ्या आयुष्यात आनंदाची उधळण व्हावी, प्रत्येक स्वप्नाला यशाची पंखं मिळावी.. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
4/7
नवं वर्ष नवी उमेद, नवे रंग घेऊन येवो, भाऊ-बहिणीचं नातं नेहमी असंच घट्ट राहो.. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
5/7
हसणं, रडणं, सगळं काही एकत्र अनुभवू, नववर्षातही आपली साथ अशीच कायम ठेवू.. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
6/7
तुझ्या यशात माझा आनंद, माझ्या दुःखात तुझी साथ, नववर्षातही असाच राहो आपला जिव्हाळ्याचा हातात हात.. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
7/7
तुझ्या प्रत्येक पावलावर यश फुलत राहो, नववर्षात आयुष्य तुझं सुखाने उजळत राहो.. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
New Year Wishes : तुमच्या भाऊ बहिणीच्या आयुष्यात घेऊन येवो आनंद-यश! या शुभेच्छांनी साजरं करा नववर्ष