TRENDING:

Chapati : चपाती मऊ राहण्यासाठी काय करावं? गृहिणी सगळी मेहनत करुन पाहातात, फक्त याच गोष्टी करत नाहीत, म्हणून फसतो बेत

Last Updated:
How to keep chapati soft : चपाती मऊ राहण्यासाठी काय करावं, यासाठी या 5 सोप्या पण अत्यंत उपयुक्त टिप्स नक्की लक्षात ठेवा.
advertisement
1/8
चपाती मऊ राहण्यासाठी काय करावं? ही पद्धत फॉलो करा, म्हणजे संपेल रोजची कटकट
सकाळी घाई असो किंवा संध्याकाळचा निवांत स्वयंपाक, घरातल्या प्रत्येक जेवणात चपाती मऊ आणि छान झाली, तर सगळ्यांचा मूड फ्रेश होतो आणि ती खायला देखील चांगली लागते. पण कितीही प्रयत्न केले तरी कधी चपाती कडक होते, कधी तुटते, तर कधी थंड झाल्यावर चिवट वाटते. “आज चपाती नीट झाली नाही” अशी कुरकुर अनेक गृहिणींच्या तोंडी रोज ऐकायला मिळते. अगदी रोज चपाती करणाऱ्यांनाही हा प्रश्न कधी ना कधी भेडसावतोच. मात्र काही छोट्या सवयी बदलल्या, तर चपाती नेहमीच मऊ, लुसलुशीत आणि चविष्ट बनू शकते.
advertisement
2/8
चपाती मऊ राहण्यासाठी काय करावं, यासाठी या 5 सोप्या पण अत्यंत उपयुक्त टिप्स नक्की लक्षात ठेवा.
advertisement
3/8
1. पीठ मळताना पाण्याचं प्रमाण योग्य ठेवाचपाती कडक होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे पीठ जास्त घट्ट किंवा खूप सैल मळणं. पीठ मळताना पाणी हळूहळू घालत जा आणि पीठ मध्यम मऊ ठेवा. खूप घट्ट पीठ असेल तर चपाती कडक होते, तर फार सैल पीठ असेल तर चपाती नीट फुगत नाही.
advertisement
4/8
2. पीठ मळल्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवाअनेक जणी घाईत पीठ मळून लगेच चपाती करतात. पण मळलेलं पीठ किमान 15–20 मिनिटं ओलसर कापडाने झाकून ठेवलं, तर पीठ नीट सैल होतं आणि चपाती मऊ लागते. हा छोटासा वेळ पोळीच्या टेक्श्चरमध्ये मोठा फरक पाडतो.
advertisement
5/8
3. मळताना थोडंसं तेल किंवा तूप वापरापीठ मळताना एक चमचा तेल किंवा तूप घातलं, तर चपाती जास्त काळ मऊ राहते. विशेषतः डब्यासाठी चपाती करायची असेल, तर हा उपाय फार उपयोगी ठरतो. तेलामुळे पीठ कोरडं पडत नाही आणि पोळीला छान लवचिकपणा येतो.
advertisement
6/8
4. तवा योग्य तापलेला आहे याची खात्री करातवा नीट गरम नसेल, तर चपाती नीट शिजत नाही आणि कडक होते. पण फार जास्त तापलेला तवा असेल, तर चपाती पटकन भाजून आतून कच्ची राहू शकते. त्यामुळे तवा मध्यम आचेवर नीट तापलेला असावा. चपाती टाकल्यावर लगेच छोटे बुडबुडे किंवा फोड त्यावर दिसू लागले, तर तापमान योग्य आहे, असं समजा.
advertisement
7/8
5. भाजलेली चपाती लगेच झाकून ठेवाचपाती भाजल्यानंतर उघडी ठेवल्यास ती पटकन कडक होते. त्यामुळे चपाती गरम असतानाच डबा किंवा झाकण असलेल्या भांड्यात ठेवावी. हवं असल्यास वरून थोडंसं तूप किंवा लोणी लावलं, तर चपाती अधिक मऊ आणि चविष्ट लागते.
advertisement
8/8
शेवटी एक महत्त्वाची गोष्टचपाती मऊ राहणं हे फक्त गव्हाच्या पिठावर नाही, तर पीठ मळण्याची पद्धत, वेळ आणि भाजण्याची कला यावरही अवलंबून असतं. रोजच्या धावपळीत या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं, तर “आज चपाती कडक झाली” अशी तक्रार घरात कधीच ऐकायला मिळणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
Chapati : चपाती मऊ राहण्यासाठी काय करावं? गृहिणी सगळी मेहनत करुन पाहातात, फक्त याच गोष्टी करत नाहीत, म्हणून फसतो बेत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल