TRENDING:

Idli : चटपटीत चिली इडलीची रेसिपी, चायनीजचं परफेक्ट फ्युजन, एकदा खाल्लं तर मुलं मागतील पुन्हा-पुन्हा

Last Updated:
तुमच्या फ्रीजमध्ये शिल्लक राहिलेल्या इडलीपासून एक जबरदस्त, चटपटीत आणि झटपट होणारा नाश्ता (Quick Snack) बनवता येतो, जो पाहून घरातील सगळेच खूश होतील. हा पदार्थ आहे 'चिली इडली' हा पदार्थ बनवायला अगदी सोपा आहे आणि चायनिज सारखा पदार्थ असल्यामुळे मुलांना तो खायला खूपच आवडतो, त्यामुळे तुमची इडली लगेचच संपेल चला, तर मग पाहूया, ही चविष्ट चिली इडली रेसिपी कशी बनवायची
advertisement
1/10
चटपटीत चिली इडलीची रेसिपी, एकदा खाल्लं तर मुलं मागतील पुन्हा-पुन्हा.
घरातील गृहिणी आणि कामावर जाणाऱ्या स्त्रिया असोत पण प्रत्येकीला मुलांसाठी किंवा नवऱ्यासाठी नाष्टा हा बनवावाच लागतो. आणि दररोज सकाळी नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न सगळ्यांनाच सतावत असतो. कधी-कधी आदल्या दिवशीच्या पदार्थ उरतो आणि तो पुन्हा खायला कंटाळा येतो अशावेळी त्याला कोणी खायला मागत नाही, मग त्याचं करायचं काय असा प्रश्न ही गृहिणींसमोर उभा रहातो कारण अन्न वाया घालवणं त्यांना पटत नाही.
advertisement
2/10
विशेषतः इडलीच्या बाबतीत असं होतं, ती बनवताना त्याचं पिठ एकदाच जास्तीचं बनवलं जातं, त्यामुळे ते पिठ उरतंच, शिवाय इडली कोण कमी खाईल कोण जास्त खाईल हे सांगता येणं शक्य नाही, त्यामुळे त्या जास्तीच्याच बनवल्या जातात. पण मग संध्याकाळी किंवा दुसऱ्यादिवशी तिच इडली कायला मुलांना किंवा घरच्यांना आवडत नाही.
advertisement
3/10
पण आता काळजी करू नका! तुमच्या फ्रीजमध्ये शिल्लक राहिलेल्या इडलीपासून एक जबरदस्त, चटपटीत आणि झटपट होणारा नाश्ता (Quick Snack) बनवता येतो, जो पाहून घरातील सगळेच खूश होतील. हा पदार्थ आहे 'चिली इडली' हा पदार्थ बनवायला अगदी सोपा आहे आणि चायनिज सारखा पदार्थ असल्यामुळे मुलांना तो खायला खूपच आवडतो, त्यामुळे तुमची इडली लगेचच संपेल चला, तर मग पाहूया, ही चविष्ट चिली इडली रेसिपी कशी बनवायची
advertisement
4/10
चटपटीत 'चिली इडली' बनवण्याची सोपी कृतीचिली इडली बनवण्यासाठी तुम्हाला लागणारे साहित्य तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असेल.
advertisement
5/10
साहित्य:शिल्लक इडली: 10 ते 12 नग (चौरस किंवा त्रिकोणी तुकडे करून घ्या)तेल: तळण्यासाठी/शॅलो फ्राय करण्यासाठीचिली सॉस/मसाल्यासाठी:तेल: 2 चमचेबारीक चिरलेला लसूण: 1 चमचाबारीक चिरलेले आले: 1/2 चमचाबारीक चिरलेला कांदा: 1 मध्यम (किंवा चौकोनी कापलेले)चौकोनी कापलेली शिमला मिरची (लाल/हिरवी/पिवळी): 1/2 कप
advertisement
6/10
हिरवी मिरची: 2-3 (बारीक चिरलेली किंवा उभी चिरलेली)सोया सॉस (Soy Sauce): 1 चमचाटोमॅटो केचप (Tomato Ketchup): 2 चमचेचिली सॉस (Red Chilli Sauce): 1 चमचा (आवडीनुसार कमी-जास्त)व्हिनेगर (Vinegar): 1/2 चमचा
advertisement
7/10
मीठ आणि साखर: चवीनुसारकॉर्नफ्लोअर (Cornflour): 1 चमचा (घोल बनवण्यासाठी)पाणी: गरजेनुसारबारीक चिरलेली स्प्रिंग ओनियन (Spring Onion) आणि कोथिंबीर गार्निशसाठी
advertisement
8/10
इडली फ्राय: इडलीचे तुकडे गरम तेलात सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या किंवा कमी तेलात शॅलो फ्राय करा. इडली एका प्लेटमध्ये काढून घ्या.एका वाटीत सोया सॉस, टोमॅटो केचप, चिली सॉस, व्हिनेगर, मीठ आणि साखर मिक्स करून बाजूला ठेवा. कॉर्नफ्लोअरमध्ये थोडे पाणी घालून त्याच्या गुठळ्या काढून पातळ घोळ तयार करा.
advertisement
9/10
मोठ्या कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर चिरलेला लसूण, आले आणि हिरवी मिरची टाकून 1 मिनिट परता.चौकोनी चिरलेला कांदा आणि शिमला मिरची टाकून जास्त न शिजवता क्रिस्पी राहील इतपत परतून घ्या.तयार केलेला सॉसचा मिक्सचर कढईत ओता आणि 1 मिनिट शिजवा.आता कॉर्नफ्लोअरचा घोल सॉसमध्ये घाला. सॉसला लगेच घट्टपणा येईल. सॉसची कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीनुसार ठेवा.
advertisement
10/10
इडली घाला: सॉस घट्ट झाल्यावर लगेच तळून घेतलेले इडलीचे तुकडे त्यात टाका.मिक्सिंग: इडलीचे तुकडे सॉसमध्ये हलक्या हाताने आणि वेगाने मिक्स करा, जेणेकरून प्रत्येक तुकड्याला मसाला व्यवस्थित लागेल.सर्व्ह करा: लगेचच गरमगरम चिली इडली सर्व्ह करा. स्प्रिंग ओनियन आणि कोथिंबीरने गार्निश करा.हा पदार्थ इतका चविष्ट लागतो की, घरातील सदस्य ती 'शिळी इडली' आहे हे विसरून जातील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
Idli : चटपटीत चिली इडलीची रेसिपी, चायनीजचं परफेक्ट फ्युजन, एकदा खाल्लं तर मुलं मागतील पुन्हा-पुन्हा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल