उन्हाळ्यात शरीर होईल थंड कूल, तयार करा झटपट असे सरबत, रेसिपी लगेच पाहा
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
उन्हाळा म्हणलं की आंब्याचा सिझन आलाचं. आंब्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे डिश तयार करत असतो किंवा पेय तयार करत असतो.
advertisement
1/5

उन्हाळा सुरू आहे. उन्हाळा म्हणलं की आंब्याचा सिझन आलाचं. आंब्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे डिश तयार करत असतो किंवा पेय तयार करत असतो. तर आंब्यापासून झटपट असे सरबत कसे करायचे? याबद्दलचं गृहिणी मेघना देशपांडे यांनी रेसिपी सांगितली आहे.
advertisement
2/5
सरबतासाठी लागणारे साहित्य : उकडलेल्या कैरीचा गर, पिकलेल्या आंब्याच्या फोडी, थोडी साखर, भिजवलेल्या सब्जा बी, वाळलेली पुदिन्याची पाने, चाट मसाला, काळे मीठ, मिरचीचे काप आणि आले हे एवढे साहित्य लागेल.
advertisement
3/5
सरबत करण्यासाठी कृती : सरबत तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये उकडलेल्या कैरीचा गर घालायचा. त्यानंतर पिकलेल्या आंब्याच्या फोडी घालायच्या. त्यामध्ये चवीनुसार साखर टाकायची.
advertisement
4/5
सगळ्यात शेवटी चवीनुसार काळे मीठ त्यामध्ये ऍड करायचं. हे सर्व साहित्य मिक्सरमधून चांगल्या पद्धतीने बारीक करून घ्यायचे.
advertisement
5/5
हे सर्व साहित्य एकदा बारीक करून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचे. पाणी हे तुम्हाला हवे तेवढे पाणी त्यात तुम्ही टाकू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
उन्हाळ्यात शरीर होईल थंड कूल, तयार करा झटपट असे सरबत, रेसिपी लगेच पाहा