Potato : बटाटे लवकर कुजतात किंवा मोड येतात? मग तुमटी पद्धत चुकतेय, घरी असा टिकवा बटाटा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेकदा महिलांची एकच तक्रार असते "बाजारातून बटाटे आणले की चार दिवसांतच ते मऊ पडतात, त्यांना मोड येतात किंवा ते कुजायला लागतात." मग आता करायचं काय?
advertisement
1/9

कांद्याप्रमाने बटाटा देखील स्वयंपाक घरातील सर्वात महत्वाचा पदार्थ आहे. तो जवळ-जवळ सगळ्याच भाजीत टाकला जातो. शिवाय त्याच्या वेगवेगळ्या भाज्या ही बनवल्या जातात. वडापाव असो, भाजी असो वा मुलांचे लाडके वेफर्स, बटाटा हा हवाच. पण अनेकदा महिलांची एकच तक्रार असते "बाजारातून बटाटे आणले की चार दिवसांतच ते मऊ पडतात, त्यांना मोड येतात किंवा ते कुजायला लागतात."
advertisement
2/9
महागाईच्या काळात भाजी फेकून देणं कोणालाच आवडत नाही. मग बटाटे महिनाभर ताजे आणि कडक कसे राहतील? यासाठी काही साध्या पण घरगुती ट्रिक्स आज आपण पाहणार आहोत, ज्या तुमच्या रोजच्या कामात खूप मदतीला येतील.
advertisement
3/9
बटाटे लवकर कुजतात? 'या' घरगुती ट्रिक्स वापरून बघा, महिनाभर राहतील ताजेबटाटा हा 'कंदमूळ' प्रकारात मोडतो. त्याला साठवण्याची एक विशिष्ट पद्धत असते. जर ती चुकली, तर बटाटा लवकर खराब होतो. खालील टिप्स वापरून तुम्ही तुमचे पैसे आणि कष्ट दोन्ही वाचवू शकता:
advertisement
4/9
कांदा आणि बटाटा 'या' जोडीला लांबच ठेवाआपल्यापैकी बहुतेक महिला एकाच टोपलीत खाली बटाटे आणि वर कांदे ठेवतात. पण हीच सर्वात मोठी चूक आह. कांद्यातून 'इथिलिन' नावाचा वायू बाहेर पडतो, ज्यामुळे बटाटे लवकर पिकतात आणि त्यांना मोड फुटू लागतात.काय कराल? कांदे आणि बटाटे नेहमी वेगवेगळ्या टोपलीत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा.
advertisement
5/9
प्लास्टिक पिशवीचा वापर टाळाबाजारातून बटाटे आणले की आपण अनेकदा ते प्लास्टिकच्या पिशवीतच ठेवतो. प्लास्टिकमध्ये हवा खेळती राहत नाही, ज्यामुळे बटाट्यांना ओलावा (Moisture) येतो आणि ते कुजायला सुरुवात होते.काय कराल? बटाटे प्लास्टिकमधून काढून लाकडी टोपलीत, कापडी पिशवीत किंवा जाळीदार टोपलीत ठेवा.
advertisement
6/9
उजेडापासून लांब ठेवाबटाट्यांना जर जास्त प्रकाश किंवा सूर्यप्रकाश मिळाला, तर ते 'सोलेनाइन' मुळे हिरवे पडू लागतात. हिरवा झालेला बटाटा आरोग्यासाठी घातक असतो.काय कराल? बटाटे साठवण्याची जागा कोरडी आणि अंधारी असावी. किचनच्या ओट्याखाली जिथे अंधार असेल अशा ठिकाणी बटाटे ठेवणे उत्तम.
advertisement
7/9
बटाटे धुण्याची चूक करू नकाअनेकदा आपल्याला वाटतं की बटाटे मातीचे आहेत म्हणून ते धुवून ठेवावे. पण बटाटा ओला झाला की त्याला बुरशी लागण्याची शक्यता 100% वाढतेकाय कराल? बटाटे वापरायच्या वेळेसच धुवा. जर माती जास्त असेल, तर सुक्या कपड्याने पुसून घ्या पण ओले करू नका.
advertisement
8/9
सफरचंदाची 'जादू'जर तुम्हाला बटाट्यांना मोड येण्यापासून वाचवायचे असेल, तर बटाट्याच्या टोपलीत एक सफरचंद ठेवा. सफरचंदामुळे बटाटे बराच काळ कडक आणि ताजे राहतात.
advertisement
9/9
घाईघाईत आपण बटाटे फ्रीजमध्ये ठेवतो. बटाटे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका. फ्रीजमधील थंडीमुळे बटाट्यातील स्टार्चचे रूपांतर साखरेत होते, ज्यामुळे त्याची चव गोड होते आणि शिजल्यावर तो काळा पडतो. बटाटे फक्त कांद्यापासून लांब ठेवलं आणि हवा खेळती राहिली, तरी तुमचे बटाटे 15-20 दिवस आरामात टिकतील. या साध्या टिप्स वापरून बघा आणि तुमची होणारी नासाडी थांबवा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
Potato : बटाटे लवकर कुजतात किंवा मोड येतात? मग तुमटी पद्धत चुकतेय, घरी असा टिकवा बटाटा