Summer Tip : उन्हाळ्यात माठाचं पाणी प्यायचंय? मग लाल, काळा की पांढरा कोणत्या रंगाचा माठ जास्त चांगला?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुम्ही बाजारात गेलात तर तुम्ही पाहिलंच असेल की तिथे वेगवेगळ्या रंगाचे माठ उपलब्ध आहे. ज्यामध्ये लाल, काळा आणि पांढरे माठ दिसतात.
advertisement
1/8

उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे आणि हळूहळू खूप जास्त उकाडा जाणवू लागला आहे. उन्हाळ्यात तहान देखील खूप लागते आणि सतत पाणी पिऊनही मन शांत होत नाही. अशावेळी लोक थंड पितात. अशावेळी माठातील पाणी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
advertisement
2/8
अनेक लोक उन्हाळ्याला सुरुवात झाली की माठातील पाणी पितात, तर काही जण माठातील पाणी पिण्यासाठी घरी नवीन माठ आणतात. पण तुम्ही बाजारात गेलात तर तुम्ही पाहिलंच असेल की तिथे वेगवेगळ्या रंगाचे माठ उपलब्ध आहे. ज्यामध्ये लाल, काळा आणि पांढरे माठ दिसतात.
advertisement
3/8
अशावेळी अनेकांच्या मनात प्रश्न येतो की कुठलं माठ विकत घ्यावं किंवा कुठल्या माठातलं पाणी पिणं जास्त फायदेशीर राहिल? चला याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात पाहू.
advertisement
4/8
तसे पाहाता तीनही माठातील पाणी पिणं शरीरासाठी उत्तम आहे. पण यासर्वात काळं माठ चांगलं आहे कारण ते पाणी लवकर थंड करतो. काळा रंग हा उष्णता वेगाने शोषून घेतो. त्यामुळे काळ्या माठातील पाणी तुलनेनं लवकर थंड होतं.
advertisement
5/8
लाल आणि पांढऱ्या माठातील पाणीही शरीरासाठी फायदेशीर असतं. मात्र, ते काळ्या माठाइतक्या वेगाने थंड होत नाही. तरीही हे दोन्ही पर्याय देखील चांगले मानले जातात.
advertisement
6/8
माठ खरेदी करताना काय लक्षात ठेवावं?हल्ली बाजारात काही माठ तयार करताना सिमेंटचा वापर केला जातो. त्यामुळे माठ खरेदी करताना योग्य ती खात्री करूनच घ्यावा.
advertisement
7/8
खऱ्या मातीचा माठ कसा ओळखायचा?मातीचा माठ हलका असतो. तर सिमेंट मिश्रित माठ वजनाने जड वाटतो. त्यामुळे वजन पाहून माठ घ्या.मातीच्या माठातील पाणी नैसर्गिकरित्या थंड राहतात.
advertisement
8/8
शेवटी कोणता माठ घ्यावा?माठाचा कोणताही रंग असो, तो नैसर्गिक मातीपासून बनवलेला असेल तर ते पाणी आरोग्यासाठी चांगलं राहील. मात्र, सर्वात जास्त थंड पाणी हवं असेल, तर काळा माठ सर्वोत्तम पर्याय ठरतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Summer Tip : उन्हाळ्यात माठाचं पाणी प्यायचंय? मग लाल, काळा की पांढरा कोणत्या रंगाचा माठ जास्त चांगला?