TRENDING:

Weight Loss : वजन कमी करायचंय? जाणून घ्या रोज किती चपात्या खाल्ल्याने कमी होईल वजन..

Last Updated:
वजन कमी करण्यासाठी लोक खूप वेगवेगळे प्रयत्न करतात. कोणी कठीण व्यायाम करतो, कोणी विविध प्रकारचे डाएट करतात आणि खाण्यावर नियंत्रण ठेवतात. पण जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही किती खाता आणि वाक्य खाता हे जास्त महत्त्वाचे असते. वजन कमी करण्यासाठी चपाती फायदेशीर ठरू शकत का? आणि ती किती प्रमाणात खावी? हे जाणून घेणंही तितकंच आवश्यक आहे.
advertisement
1/7
वजन कमी करायचंय? जाणून घ्या रोज किती चपात्या खाल्ल्याने कमी होईल वजन..
चपातीमध्ये कर्बोदकांशिवाय इतर अनेक पोषक तत्व असतात. यामध्ये अनेक प्रकारचे मायक्रो न्यूट्रिएंट्स, प्रोटिन आणि फायबर असतात. त्यामुळे काही जण गव्हाचं पीठ चाळून घेत नाही, जेणेकरून यातील फायबर्स निघून जाऊ नयेत. एका चपातीतून मिळणाऱ्या कॅलरीचा विचार केला तर यामध्ये 15 ग्रॅम कार्ब्स, 3 ग्रॅम प्रोटिन, 0.4 ग्रॅम फॅट आणि 71 कॅलरी असतात.
advertisement
2/7
तज्ज्ञांच्या मते, आपण केवळ गव्हाची चपातीचा खाऊ नये. आहार बदलून बदलून खाल्ल्याने शरीराला आवश्यक ते सर्व पोषक तत्व मिळतात. तसेच एक व्यक्ती दिवसभरात 4 ते 5 चपात्या खाऊ शकते.
advertisement
3/7
एका व्यक्तीने दिवसाभरात योग्य प्रमाणात चपाती खावी. अन्यथा याचे आरोग्याला नुकसान होऊ शकते. गव्हामध्ये ग्लूटेन असते, जे आतड्यांमध्ये चिटकू शकते. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर गव्हाच्या पिठाचेसोबत तुम्ही इतरही पिठाच्या चपात्या खाऊ शकता.
advertisement
4/7
चण्याचे पीठ म्हणजे बेसन पिठाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. बेसन पिठात पांढऱ्या पिठाच्या तुलनेत 25 टक्के कमी कॅलरी असतात. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. यामध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते.
advertisement
5/7
नाचणी सुपर फूड म्हणूनही ओळखली जाते. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे जास्त वेळ भूक न लागता पोट भरलेले राहते. आहारातील मॅग्नेशियम मधुमेहींसाठी उत्तम आहे, हे हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. तसेच हे लठ्ठपणा टाळते, पचन सुधारते, यामध्ये कॅल्शियम देखील भरपूर असते जे हाडांसाठी चांगले असते.
advertisement
6/7
वजन कमी करण्यासाठी गव्हाऐवजी बार्लीचे म्हणजेच जवाचे पीठ हा उत्तम पर्याय असू शकतो. या प्रकारच्या पीठासाठी 10 किलो चण्याचे पीठ किंवा गव्हाचे पीठ आणि 2 किलो बार्ली बारीक करा. या पिठापासून बनवलेल्या चपात्या खाल्ल्याने वजन लवकर कमी होण्यास मदत होते.
advertisement
7/7
हे गव्हाचा कोंडा म्हणजे गव्हाचे बाह्य कवच असते. नेहमीच्या गव्हाच्या पिठात कोंडा टाकल्यास वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. चपातीचे पीठ मळताना हे मिश्रण 2:1 या प्रमाणात घ्यावे. म्हणजेच दोन कप कोंडा एक कप गव्हाच्या पिठात मळून घ्या आणि त्याच्या चपात्या बनवा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Weight Loss : वजन कमी करायचंय? जाणून घ्या रोज किती चपात्या खाल्ल्याने कमी होईल वजन..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल