TRENDING:

Akola Accident : आमदार सरनाईकांच्या कुटुंबाचा भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू, पुतण्याचाही समावेश, घटनास्थळाचे PHOTO

Last Updated:
Akola Accident : अकोल्यातील पातूर बाळापूर रोडवर दोन कारचा समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. (कुंदन जाधव, प्रतिनिधी)
advertisement
1/5
आमदार सरनाईकांच्या कुटुंबाचा भीषण अपघात, 6 जण ठार, पुतण्याचाही समावेश, PHOTOS
अकोला जिल्ह्यातील पातूर घाटातील नवीन बायपासवरील नानासाहेब मंदिरसमोर दोन कारचा समोरासमोर धडक झाल्याने <a href="https://news18marathi.com/photogallery/news/shivsena-ubt-leader-sushama-andhare-helicopter-crash-mahad-photos-viral-mhsy-1174560.html">भीषण अपघात</a> घडला.
advertisement
2/5
यात सरनाईक कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचं समोर आलंय. कुटुंबातील एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. यात दोन चिमुकल्यांचाही समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली. सरनाईक कुटुंब हे वाशीमला जात असताना ही घटना घडली.
advertisement
3/5
<a href="https://news18marathi.com/maharashtra/akola/">अकोला वाशिम मार्गावर</a> काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे, त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक एकाच रस्त्यावर वळविण्यात आली होती, त्यामुळेच ही दोन्ही वाहने एकाच रस्त्यावर आल्याने यांचा अपघात समोरासमोर झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
advertisement
4/5
या अपघातात मृतांमध्ये आमदार किरण सरनाईक यांच्या पुतण्याचा देखील समावेश आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये तीन जण गंभीर जखमी आहेत, जखमींवर सरोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
5/5
हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास पातुर पोलीस करीत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अकोला/
Akola Accident : आमदार सरनाईकांच्या कुटुंबाचा भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू, पुतण्याचाही समावेश, घटनास्थळाचे PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल