Weather Alert: नांदेडवर सूर्याचा कोप, बीड, धाराशिवमध्ये दुपारनंतर संकट, आजचा हवामान अंदाज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
Marathwada Weather: मराठवाड्यात उष्णतेची लाट आलेली असतानाच पुन्हा नवं संकट घोंघावत आहे. बीड, धाराशिव, लातूरला आज अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/5

मराठवाड्यात सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार 25 एप्रिल रोजी बीड, लातूर, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअस दरम्यान राहणार आहे. तर बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत दुपारनंतर गडगडाटी वादळासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
advertisement
2/5
बीड जिल्ह्यात कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27 अंश राहण्याची शक्यता आहे. आकाश पूर्णपणे स्वच्छ राहणार असून दुपारी उष्माघाताचा धोका संभवतो. तर दुपारनंतर ढगाळ हवामानासह वादळी पावसाची शक्यता आहे.
advertisement
3/5
लातूर जिल्ह्यात 25 एप्रिलला कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस राहणार असून किमान तापमान 28 अंश असेल. पुढीलकाही काळ उन्हाचा तडाखा कायम राहणार आहे. सायंकाळी आकाश अंशत: ढगाळ राहील.
advertisement
4/5
धाराशिव जिल्ह्यात कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश राहण्याचा अंदाज आहे. या भागात ग्रामीण भागातही उष्णतेचा परिणाम दिसून येत आहे. शेती काम करणाऱ्या नागरिकांनी योग्य सावधगिरी बाळगावी.
advertisement
5/5
नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक उष्णता जाणवण्याची शक्यता आहे. येथे कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस आणि किमान 28 अंश राहणार आहे. पुढील तीन दिवस उन्हाचा जोर कायम राहील. नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असा सल्ला दिला जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/बीड/
Weather Alert: नांदेडवर सूर्याचा कोप, बीड, धाराशिवमध्ये दुपारनंतर संकट, आजचा हवामान अंदाज