TRENDING:

Marathwada Weather : मराठवाडा गारठला! 2 जिल्ह्यांत 10 अंश सेल्सिअस तापमान, हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
उत्तरेकडून येत असलेल्या थंड हवेच्या प्रभावामुळे राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग वगळता असामान्य गारठा पाहायला मिळतोय. पाहुयात मराठवाड्यातील हवामान कसं असेल.
advertisement
1/5
मराठवाडा गारठला! 2 जिल्ह्यांत 10 अंश सेल्सिअस तापमान, हवामान विभागाचा अलर्ट
उत्तरेकडून येत असलेल्या थंड हवेच्या प्रभावामुळे राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग वगळता असामान्य गारठा पाहायला मिळतोय. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान अगदी 10 अंशांपर्यंत खाली आले आहे. पाहुयात मराठवाड्यातील हवामान कसं असेल.
advertisement
2/5
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातील पावसानंतर संपूर्ण मराठवाड्यात शीतलहर पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. 10 नोव्हेंबर रोजी देखील गारठा असाच कायम राहणार आहे.
advertisement
3/5
त्याचबरोबर मराठवाड्यातील बीडमध्ये देखील किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. जालना 11 अंश सेल्सिअस, परभणी 12 अंश सेल्सिअस, नांदेडमध्ये 13 अंश सेल्सिअस तर धाराशिवमध्ये 14 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
4/5
13 नोव्हेंबरपासून किमान तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून यामुळे वाढलेल्या गारठ्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. 13 नोव्हेंबरपासून किमान तापमानात 15 ते 16 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
दरम्यान, या थंड हवामानात गरम कपडे वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींची विशेष काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather : मराठवाडा गारठला! 2 जिल्ह्यांत 10 अंश सेल्सिअस तापमान, हवामान विभागाचा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल