Marathwada Weather : मराठवाड्यासाठी दिलासा, पावसाचा जोर कमी होणार, हवामान विभागाचं महत्त्वाचं अपडेट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
मराठवाड्यातील पावसाचा जोर 29 सप्टेंबर रोजी कमी होण्याची शक्यता आहे. सात जिल्ह्यात हलक्यातील मध्यम पाऊस शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
1/5

मराठवाड्यातील पावसाचा जोर 29 सप्टेंबर रोजी कमी होण्याची शक्यता आहे. 29 सप्टेंबर रोजी केवळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित सात जिल्ह्यात हलक्यातील मध्यम पाऊस शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
2/5
मागील काही दिवसात मराठवाड्यातील सर्व आठही जिल्ह्यात मुसळधार हजेरी लावण्याचा पाहायला मिळालं. परंतु 28 सप्टेंबरपासून पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवस मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगरमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगरला पावसासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
4/5
तर जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. परंतु या सातही जिल्ह्यांना कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
advertisement
5/5
मराठवाड्यात पाऊस काही काळ उसंत घेत असल्याने मराठवाड्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यामध्ये 2 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather : मराठवाड्यासाठी दिलासा, पावसाचा जोर कमी होणार, हवामान विभागाचं महत्त्वाचं अपडेट