TRENDING:

Nashik: वनरक्षकाचा चेहराच पकडला अन् एकाचा खांदा, सोसायटीत शिरलेल्या बिबट्याचे 8 PHOTOS

Last Updated:
आज नाशिकमध्ये भर दिवसा एक बिबट्या सोसायटीमध्ये शिरला. तब्बल ३ तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला कसंबसं जेरबंद करण्यात आलं.
advertisement
1/8
वनरक्षकाचा चेहराच पकडला अन् एकाचा खांदा, सोसायटीत शिरलेल्या बिबट्याचे 8 PHOTOS
मागील काही दिवसांपासून पुणे, नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये बिबट्याने हैदोस घातला आहे. नागरी वस्तीत शिरून लहान मुलांवर हल्ला करणे, या घटना आता किरकोळ झाल्या आहे. अशातच आज नाशिकमध्ये भर दिवसा एक बिबट्या सोसायटीमध्ये शिरला.
advertisement
2/8
तब्बल ३ तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला कसंबसं जेरबंद करण्यात आलं. पण, या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वनरक्षकासह ३ नागरिक जखमी झाले.
advertisement
3/8
नाशिकमधील गंगापूर रोड परिसरात शुक्रवारी दुपारी एक बिबट्याने धुमाकूळ घातला. गंगापूर महात्मानगर परिसरात संत कबीरनगर आणि वनविहार कॉलनीमध्ये बिबट्याने एंट्री केली. स्थानिक लोकांना बिबट्याचं दर्शन होताच 'बिबट्या आला रे' म्हणत बातमी वाऱ्यासारखी पसरली. तोपर्यंत बिबट्याने एका सोसायटीमध्ये जाऊन आसरा घेतला. 
advertisement
4/8
वनरक्षक दलाची आणखी कुमक घटनास्थळी दाखल झाली. आता बिबट्याला पाहण्यासाठी मीडियाचे प्रतिनिधी आणि लोकांची झुंबड उडाली. त्यामुळे बिबट्या आणखी बिथरला.
advertisement
5/8
परिसरात मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाल्याने पोलिसांनी तत्काळ नागरिकांना बाहेर येण्यास मजाव केला.  बिबट्याच्या हालचालींवर नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभागाने परिसरात शेकडो मीटरचा घेराव घातला होता. पिंजरा लावून पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली.
advertisement
6/8
वन रक्षक दलाच्या जवानांनी नेट टाकून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता. पण, बिबट्या तिथून निसटला आणि एका दोन वनरक्षकांवर हल्ला केला. यामध्ये एका जवानाच्या हाताला मोठी दुखापत झाली.
advertisement
7/8
बिबट्याने हातावर चावा घेतला. त्यामुळे या वनरक्षकाला तातडीने शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं.
advertisement
8/8
अखेरीस वनरक्षक दलाच्या जवानांनी ट्रॅक्युलायझरच्या मदतीने बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्यात आलं. बिबट्याला जेरबंद केल्यानंतर  म्हसरूळ येथील वन्यजीव उपचार केंद्रात हलवण्यात आलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Nashik: वनरक्षकाचा चेहराच पकडला अन् एकाचा खांदा, सोसायटीत शिरलेल्या बिबट्याचे 8 PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल