TRENDING:

Avocado Hand : अ‍ॅव्होकाडो चिरताना बऱ्याच लोकांना होतो त्रास! तुम्हाला माहितीये, अ‍ॅव्होकाडो हॅन्ड म्हणजे काय?

Last Updated:
हल्ली आपल्याकडेही बरेच लोक अ‍ॅव्होकाडो नियमितपणे खातात. काही लोकांना या फळाबद्दल उत्सुकता असते. पण तुम्हाला माहितीये, बऱ्याच लोकांना अ‍ॅव्होकाडो हॅन्डचा त्रास होतो. पण म्हणजे नेमकं काय? चला पाहूया.
advertisement
1/9
अ‍ॅव्होकाडो चिरताना बऱ्याच लोकांना होतो त्रास! तुम्हाला माहितीये, अ‍ॅव्होकाडो हॅन्ड म्हणजे काय?
अ‍ॅव्होकाडो C, E, K आणि B6 या जीवनसत्वांचा समृद्ध स्रोत आहेत. अ‍ॅव्होकाडो रोगप्रतिकार शक्तीला मजबूत बनवण्यासाठी मदत करतात. तसेच अ‍ॅव्होकाडोमध्ये रायबोफ्लेविन, नियासिन, फोलेट, पॅन्टोथेनिक ॲसिड, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स मुबलक प्रमाणात आढळतात.
advertisement
2/9
अ‍ॅव्होकाडोचा आपल्या आहारात समावेश करणं तसं सोपं आहे. ते आपण इतर फळांप्रमाणे तसाही खाऊ शकतो किंवा सॅलडमध्ये, सॅन्डविचेसमध्ये आणि टोस्टवरही आपण अ‍ॅव्होकाडो टाकून खाऊ शकतो. तुम्हालाही अ‍ॅव्होकाडो खायला खुपावाडात असेल तर तो चिंतन थोडी काळजी घ्या.
advertisement
3/9
होय, अ‍ॅव्होकाडो चिरताना काळजी घ्या. कारण जगभरात 'अ‍ॅव्होकाडो हॅन्ड'च्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पण हा 'अ‍ॅव्होकाडो हॅन्ड' म्हणजे नेमकं काय आहे आणि अ‍ॅव्होकाडो चिरताना आपण काय काळजी घ्यावी.
advertisement
4/9
अ‍ॅव्होकाडो चिरताना जर तुमचा हात कापला गेला तर त्याला 'अ‍ॅव्होकाडो हॅन्ड' असं म्हणतात. तुम्हाला वाटेल यात काय नवीन कोणतंही फळ चिरताना असं होऊच शकतं. पण नाही अ‍ॅव्होकाडोसोबत अशा घटना होण्याचं प्रमाण जरा जास्त आहे.
advertisement
5/9
अ‍ॅव्होकाडो खूप मलईदार आणि मऊ फळ असतं. तुम्ही हातात घेऊन अ‍ॅव्होकाडोची बी सूरीने काढायचा प्रयत्न करता, तेव्हाच हे घडतं. म्हणजेच तुमचा हात कापला जाऊ शकतो. कारण अ‍ॅव्होकाडो निसरडं फळ असल्याचे चिरताना त्यावरून हात सटकतो आणि दुखापत होण्याची शक्यता वाढते.
advertisement
6/9
बऱ्याचदा खूप दाब देऊन सूरी आत घालण्याचा प्रयत्न करता तेव्हा हाताला किंवा बोटांना दुखापत होऊ शकते. यालाच वैद्यकीय भाषेत 'अ‍ॅव्होकाडो हॅन्ड' म्हणतात. अशाप्रकारे हा कापला गेला तर हाताच्या नसा आणि स्नायूंना नुकसान पोहोचू शकते. काहीवेळा ऑपरेशन करण्याचीही गरज पडते.
advertisement
7/9
अ‍ॅव्होकाडो हातात घेऊन कापू नका. कटिंग बोर्डवर घ्या आणि काळजीपूर्वक कापा. यामुळे हात चिरण्याची शक्यता कमी होते. अ‍ॅव्होकाडोची बी काढण्यासाठी चॉपिंग बोर्डच वापरा आणि चाकूऐवजी चमच्याने कोय काढा. अ‍ॅव्होकाडो जास्त पिकलेलं असेल तर बी सहज हातानंही काढता येतं.
advertisement
8/9
अ‍ॅव्होकाडो कटिंग बोर्डवर ठेऊन तो आधी हळुवारपणे उभा कापा. यानंतर अ‍ॅव्होकाडो आडव्या दिशेने फिरवा. याने बी सहज वेगळी होईल. आता चाकूने साल काढण्याऐवजी चमच्याने गर काढा. अशाप्रकारे तुम्ही अ‍ॅव्होकाडो कोणतीही दुखापत करून न घेता कापू शकता.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Avocado Hand : अ‍ॅव्होकाडो चिरताना बऱ्याच लोकांना होतो त्रास! तुम्हाला माहितीये, अ‍ॅव्होकाडो हॅन्ड म्हणजे काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल