Cancer : सतत पाठ किंवा डोकं दुखतंय? 'या' 5 ठिकाणच्या वेदनांकडे दुर्लक्ष नका करू; असू शकते कॅन्सरची पूर्वसूचना
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तज्ज्ञांच्या मते, कॅन्सरचे निदान जर सुरुवातीच्या टप्प्यात झाले, तर उपचार सोपे होतात. म्हणूनच, आपल्या शरीराकडून मिळणाऱ्या 'या' 5 धोक्याच्या सिग्नलकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
advertisement
1/10

आपल्या धावपळीच्या आयुष्यात दुखणं हे जणू पाचवीलाच पुजलेलं असतं. कधी कामाच्या व्यापाने पाठ दुखते, तर कधी प्रवासाच्या थकव्याने डोकं ठणकतं. अशा वेळी आपण काय करतो? सरळ मेडिकलमधून एखादी पेनकिलर घेतो किंवा मलम लावतो आणि पुन्हा कामाला लागतो. बहुतेक वेळा हे दुखणं साधंच असतं, पण कधी विचार केलाय का की, जर हे दुखणं औषध घेऊनही थांबत नसेल तर?
advertisement
2/10
हो, शरीराच्या काही विशिष्ट भागांतील सततच्या वेदना हे केवळ थकव्याचं लक्षण नसून, शरीराच्या आत वाढणाऱ्या कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचा इशारा असू शकतात. तज्ज्ञांच्या मते, कॅन्सरचे निदान जर सुरुवातीच्या टप्प्यात झाले, तर उपचार सोपे होतात. म्हणूनच, आपल्या शरीराकडून मिळणाऱ्या 'या' 5 धोक्याच्या सिग्नलकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
advertisement
3/10
आजकल लॅपटॉपवर काम करणे किंवा चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे 80 टक्के लोकांना पाठदुखीचा त्रास होतो. पण, जर तुमची पाठदुखी खूप खोलवर असेल, जुनी झाली असेल आणि आराम करूनही कमी होत नसेल, तर सावधान
advertisement
4/10
स्वादुपिंड, स्तन, फुफ्फुस किंवा प्रोस्टेट कॅन्सरमध्ये वेदना पाठीपर्यंत पसरू शकतात. विशेषतः जर रात्रीच्या वेळी वेदना वाढत असतील, भूक लागत नसेल आणि वजन वेगाने कमी होत असेल, तर तातडीने डॉक्टरांना भेटा. गॅस किंवा ॲसिडिटीमुळे पोट दुखणे सामान्य आहे. मात्र, जर पोटातील वेदना थांबत नसतील आणि उलट वाढत असतील, तर ते यकृत, कोलन किंवा अंडाशयाचा कॅन्सर असल्याचे लक्षण असू शकते.
advertisement
5/10
कधी सावध व्हावे?जर शौचाच्या सवयींमध्ये बदल झाला असेल, शौचावाटे रक्त येत असेल किंवा जेवल्यानंतर सतत जळजळ होत असेल, तर याकडे दुर्लक्ष करू नका.
advertisement
6/10
डोकं दुखणं ही तक्रार घरोघरी असते. पण जर तुम्हाला अचानक अशा प्रकारची डोकेदुखी सुरू झाली जी याआधी कधीच जाणवली नव्हती आणि ती औषधानेही बरी होत नसेल, तर हे ब्रेन ट्यूमरचे लक्षण असू शकते. डोळ्यांसमोर अंधारी येणे, स्मरणशक्ती कमी होणे किंवा वागण्यात अचानक बदल होणे ही धोक्याची घंटा आहे.
advertisement
7/10
वाढत्या वयानुसार सांधे दुखणे आपण स्वाभाविक मानतो. पण जर ही वेदना एकाच विशिष्ट ठिकाणी सतत होत असेल आणि विश्रांती घेतानाही थांबत नसेल, तर ते 'ल्यूकेमिया' किंवा 'ऑस्टिओसार्कोमा' असू शकते. यासोबत सतत ताप किंवा थकवा जाणवत असेल, तर तातडीने स्कॅन करणे आवश्यक आहे.
advertisement
8/10
छातीत दुखणे म्हणजे नेहमीच हृदयविकार असतो असे नाही. जर हृदयाची सर्व तपासणी नॉर्मल असेल आणि तरीही छाती दुखत असेल, तर ते फुफ्फुसाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते. वेदनांसोबत सततचा खोकला, थुंकीतून रक्त पडणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा आवाजात बदल होणे ही लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या.
advertisement
9/10
दिल्लीच्या एम्समधील कॅन्सर तज्ज्ञ डॉ. श्रेयांग मल्होत्रा सांगतात की, "जर एखाद्या वेदनेवर साध्या उपचारांनी फरक पडत नसेल आणि ती दिवसेंदिवस तीव्र होत असेल, तर ते शरीरात वाढणाऱ्या गंभीर आजाराचे पहिले लक्षण असू शकते. कॅन्सरच्या बाबतीत लवकर निदानहाच सर्वोत्तम बचाव आहे."
advertisement
10/10
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Cancer : सतत पाठ किंवा डोकं दुखतंय? 'या' 5 ठिकाणच्या वेदनांकडे दुर्लक्ष नका करू; असू शकते कॅन्सरची पूर्वसूचना