रणवीर-आदित्यची जोडी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवणार, 'धुरंधर' नंतर 'या' फिल्मसाठी येणार एकत्र, समोर आली मोठी अपडेट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Aditya Dhar Films: 'उरी'नंतर 'धुरंधर' चित्रपटांच्या सीरिजने बॉक्स ऑफिसवर जो पराक्रम गाजवला, त्यानंतर आदित्य धर आता इंडस्ट्रीतील सर्वात सक्सेसफुल दिग्दर्शक बनला आहे.
advertisement
1/8

बॉलिवूडमध्ये सध्या एकाच दिग्दर्शकाचं नाव गाजतंय ते म्हणजे आदित्य धर. आदित्य धर यांनी त्यांच्या करिअरमध्ये केवळ तीन फिल्म्स डायरेक्ट केल्या असून या तिन्ही फिल्म्स सुपरहिट ठरल्या आहेत. 'उरी'नंतर 'धुरंधर' चित्रपटांच्या सीरिजने बॉक्स ऑफिसवर जो पराक्रम गाजवला, त्यानंतर आदित्य धर आता इंडस्ट्रीतील सर्वात सक्सेसफुल दिग्दर्शक बनला आहे.
advertisement
2/8
पण, 'धुरंधर २' च्या अवाढव्य यशानंतर आता आदित्य नक्की काय करणार? तो पुन्हा एकदा विकी कौशलसोबत दिसणार की रणवीर सिंगसोबत नवा इतिहास घडवणार? या प्रश्नांनी सध्या सिनेसृष्टीत खळबळ माजली आहे.
advertisement
3/8
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य सध्या काही काळ विश्रांती घेत असला तरी, त्याच्या डोक्यात तीन मोठ्या प्रोजेक्ट्स सुरू आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला आणि काही कारणास्तव डब्यात गेलेला 'द इमोर्टल अश्वत्थामा' हा प्रोजेक्ट पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे.
advertisement
4/8
महाभारतातील या अजरामर पात्रावर आधारित हा चित्रपट आदित्यचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो. आधी यात विकी कौशल मुख्य भूमिकेत होता. आता 'धुरंधर'च्या दमदार यशानंतर निर्मात्यांचा आदित्यवरचा विश्वास वाढला असून, हा चित्रपट नव्या स्केलवर आणि भव्य रूपात प्रेक्षकांसमोर येऊ शकतो.
advertisement
5/8
आदित्य धर आणि रणवीर सिंग या जोडीने 'धुरंधर'मध्ये जी कामगिरी दाखवली, ती पाहता प्रेक्षकांना ही जोडी पुन्हा पडद्यावर पाहायची आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आदित्य एका भव्य ऐतिहासिक चित्रपटावर काम करत असून तो चंद्रगुप्त मौर्य यांच्या जीवनावर आधारित असू शकतो.
advertisement
6/8
येत्या काही आठवड्यांत आदित्य आणि रणवीर पुन्हा एकदा एकत्र बसून या प्रोजेक्टची पुढील दिशा ठरवणार आहेत. जर हा चित्रपट फायनल झाला, तर तो जागतिक स्तरावरचा एक पिरियड ड्रामा असेल यात शंका नाही.
advertisement
7/8
नेहमी अ‍ॅक्शन आणि हाय-व्होल्टेज ड्रामा देणारा आदित्य आता आपला जॉनर बदलण्याच्या तयारीत असल्याचंही बोललं जातंय. आदित्य एका स्पोर्ट्स ड्रामावर काम करत असल्याची बातमी समोर आली आहे. जर हा चित्रपट निश्चित झाला, तर आदित्यच्या दिग्दर्शनाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अद्याप या चित्रपटाचं नाव गुलदस्त्यात असलं, तरी त्याबद्दल आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
8/8
आदित्य धरने आजवर जे चित्रपट हाताळले आहेत, त्यातून त्याने हे सिद्ध केलंय की त्याला प्रेक्षकांची नाडी अचूक ओळखता येते. वरील चित्रपटांची अधिकृत घोषणा जरी झाली नसली, तरी या तिन्हीपैकी जो कोणताही चित्रपट आधी येईल, तो बॉलिवूडमध्ये नवा विक्रम प्रस्थापित करेल, हे मात्र नक्की.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रणवीर-आदित्यची जोडी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवणार, 'धुरंधर' नंतर 'या' फिल्मसाठी येणार एकत्र, समोर आली मोठी अपडेट