Tata Sierra चा थेट भिडणार, Mahindra करणार मोठा धमाका, आणतेय स्वस्त हायटेक SUV
- Published by:Sachin S
Last Updated:
महिंद्रा मोटर्सने एसयूव्ही सेगमेंटमध्ये एकच धडाका लावला आहे. एकापाठोपाठ दमदार अशा एसयूव्ही पेट्रोल आणि ईव्ही सेगमेंटमध्ये लाँच केल्या आहेत. आता 2026 मध्ये महिंद्रा नवीन मॉडेल्स घेऊन येणार आहे.
advertisement
1/9

मागील काही वर्षांपासून भारतीय ऑटो इंडस्ट्रीमध्ये फार मोठे बदल पाहण्यास मिळाले आहे. आता कारच्या किंमतीत एसयूव्ही उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे महिंद्रा मोटर्सने एसयूव्ही सेगमेंटमध्ये एकच धडाका लावला आहे. एकापाठोपाठ दमदार अशा एसयूव्ही पेट्रोल आणि ईव्ही सेगमेंटमध्ये लाँच केल्या आहेत. आता 2026 मध्ये महिंद्रा नवीन मॉडेल्स घेऊन येणार आहे. यात Mahindra Scorpio N-Based Pickup, Scorpio N Facelift, Mahindra Vision S आणि Mahindra XUV 3XO CNG लाँच होणार आहे.
advertisement
2/9
Mahindra XUV 3XO- Mahindra XUV 3XO ही एक मिडसाईज एसयूव्ही आहे. आता महिंद्रा CNG व्हेरिएंट आणण्याची तयारी करत आहे, यामध्ये 1.2-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन असेल. CNG किटमुळे मायलेजसाठी बेस्ट पर्याय ठरेल. सध्याच्या XUV 3XO चे फिचर्स जे आहे तेच असणार आहे.
advertisement
3/9
ADAS, पॅनोरमिक सनरूफ, हार्मन कार्डन ऑडिओ हे फिचर्स CNG व्हेरिएंटमध्येही मिळू शकतात. CNG मध्ये Mahindra XUV 3XO आल्यामुळे मायलेज 25 किमी मिळण्याची शक्यता आहे. Mahindra XUV 3XO ची किंमत 8.2 ते 13 लाख एक्स-शोरूम इतकी असण्याची शक्यता आहे.
advertisement
4/9
Mahindra Scorpio N-Based Pickup ही एक पिकअप सेगमेंटमध्ये एसयूव्ही असणार आहे. Global Pik Up 2023 मध्ये या गाडीची झलक पाहण्यास मिळाली होती. ही एक लाइफस्टाइल पिकअप ट्रक असणार आहे. जे अ‍ॅडव्हेंचर आणि ग्रामीण भागात फॅमिलीसाठी बेस्ट असणार आहे. अलीकडेच या गाडीची टेस्ट सुरू झाली आहे. ही गाडी Scorpio N SUV पेक्षा जास्त लांब आणि मजबूत असणार आहे. ड्युअल-कॅब डिझाईनसह हे मॉडेल Scorpio N ची स्टाईल पुढे करेल. यात 2.2-लिटर डिझेल इंजिन दिलं आहे जे 175 बीएचपी पॉवर आणि 200 hp चा टार्क जनरेट करेल.
advertisement
5/9
ही गाडी पेट्रोल सेगमेंटमध्येही येईल, या ट्रॅकमध्ये 4x4 सिस्टम आणि लो-गिअरिंग ऑफ-रोडिंगसाठी उत्तम असेल. फीचर्समध्ये मोठा टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि प्रीमियम इंटिरियर असेल. Mahindra Scorpio N-Based Pickup ची किंमत अंदाजे 20 ते 27 लाख एक्स-शोरूम इतकी असण्याची शक्यता आहे, २०२६ च्या वर्षाअखेरीस लाँच होईल.
advertisement
6/9
Scorpio N ही एक महिंद्राची दमदार SUV आहे, Scorpio N चं आता फेसलिफ्ट मॉडेल 2026 मध्ये ऑगस्टच्या सुमारास लाँच होईल, Scorpio N च्या डिझाईनमध्ये थोडे बदल केले असतील, नवीन हेडलॅम्प्स, टेललॅम्प्स, नवीन ग्रिल आणि 18-इंच अलॉय व्हील्स असेल.
advertisement
7/9
फिचर्सबद्दल बोलायचं झालं तर 10.25-इंच टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॅनोरमिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा आणि लेव्हल-2 ADAS फिचर्स असेल. इंजिन हे 2.0 लिटर टर्बो-पेट्रोल 200 बीएचपी आणि 2.2-लीटर डिझेल 175 बीएचपी जे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्हीमध्ये RWD/4WD पर्यायांसह येईल. Scorpio N ची किंमत अंदाजे 14 ते 24 लाखांच्या दरम्यान असेल.
advertisement
8/9
Mahindra Vision S - ही एक महिंद्राची नवीन बोलेरो असणार आहे. ही एक ICE, हायब्रिड आणि EV इंजिनला सपोर्ट करणारी एसयूव्ही असणार आहे. Mahindra Vision S ची अलीकडे झलक पाहण्यास मिळाली होती, बॉक्सी लूक, सरळ टेलगेटवर स्पेअर व्हील असा लूक दिला आहे.
advertisement
9/9
Mahindra Vision S मध्ये XUV 3XO मधील 1.2-लीटर टर्बो-पेट्रोल आणि 1.5-लीटर डिझेल इंजिन मिळू शकते. फिचर्समध्ये मॉडर्न केबिन, चांगले इन्फोटेनमेंट आणि प्रॅक्टिकल स्पेस असणार आहे. या Mahindra Vision S ची किंमत अंदाजे 9 ते 16 लाख असू शकते. २०२६ च्या अखेरीस ही एसयूव्ही लाँच होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Tata Sierra चा थेट भिडणार, Mahindra करणार मोठा धमाका, आणतेय स्वस्त हायटेक SUV