RR vs GT : 4 विकेट घेणारा राहिला बाजूला, 6 बॉल टाकून तो हिरो बनला, राजस्थानच्या विजयाचा थरारक टर्निंग पॉईंट
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 210 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स फक्त 204 धावाच करू शकली होती.त्यामुळे या राजस्थानने हा सामना 6 धावांनी जिंकला आहे.
advertisement
1/9

आयपीएलमध्ये आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सचा अवघ्या 6 धावांनी पराभव केला आहे. या विजयाचा खरा शिल्पकार वेगळाच होता, पण शेवट ओव्हर टाकून एक खेळाडू मॅच विनर ठरला आहे.
advertisement
2/9
राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 210 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स फक्त 204 धावाच करू शकली होती.त्यामुळे या राजस्थानने हा सामना 6 धावांनी जिंकला आहे.
advertisement
3/9
राजस्थान रॉयल्सने दिलेल्या 210 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातकडून साई सुदर्शन आणि कुमार कुशाग्रने चांगली सूरूवात केली होती. कुमार कुशाग्र 18 धावा करून बाद झाला होता.
advertisement
4/9
कुशाग्र बाद झाल्यानंतर जोस बटलर मैदानात आला होता. यावेळेस साई सुदर्शन एका बाजूने आक्रामक खेळी करत होता. पण तो 44 बॉलमध्ये 73 धावा करून बाद झाला. त्याची विकेट ही रवी बिश्नोईने काढली होती.
advertisement
5/9
सुदर्शन बाद झाल्यानंतर रवि बिश्नोईने लागोपाठ ग्लेन फिलिप्स आणि वॉशिंग्टन सुंदरची विकेट काढली होती. या दोन्ही विकेट खूपच महत्वपूर्ण होत्या.त्यामुळे इथेच संपूर्ण मॅच फिरली होती.
advertisement
6/9
झटपट विकेट पडल्यानंतर नांदे बर्गरने जोस बटलरला पव्हेलियनचा रस्ता दाखवला होता.तो 26 धावांवर बाद झाला. त्यानंतर रवि बिश्नोईने पुन्हा एकदा राहुल तेवतियाची विकेट काढली होती. या विकेटद्वारे त्याने आयपीएलमध्ये पहिले 4 विकेट घेतले आहेत.
advertisement
7/9
इतके विकेट पडल्यानंतर शेवटी राशीद खान आणि कगिसो रबाडाने मॅच जवळपास आणली होती.कारण विजयासाठी शेवटच्या ओव्हमध्ये 11 धावा हवा होत्या. यावेळी राजस्थान रॉयल्सकडून तुषार देशपांडे गोलंदाजी करायला आला होता. देशपांडेने यावेळी फक्त 4 धावा दिल्या.त्यामुळे राजस्थानने हा सामना 6 धावांनी जिंकला.
advertisement
8/9
राजस्थानच्या या विजयात खरा वाटा होता रवी बिश्नोईचा होता कारण त्याने 4 महत्वपूर्ण विकेट घेतल्या होत्या. पण शेवटच्या ओव्हरमध्ये देशपांडे उत्कृष्ट ओव्हर टाकून भाव खाऊन गेला होता.
advertisement
9/9
राजस्थानकडून ध्रुव जुरेलने 75 धावांची सर्वाधिक खेळी केली होती.यासोबत यशस्वी जयस्वालच्या 55 आणि वैभव सूर्यवंशीच्या 31 धावांच्या बळावर संघाने 6 विकेट गमावून 210 धावा केल्या होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
RR vs GT : 4 विकेट घेणारा राहिला बाजूला, 6 बॉल टाकून तो हिरो बनला, राजस्थानच्या विजयाचा थरारक टर्निंग पॉईंट