GK : दोन डोळे आणि दोन कानच का? मानवी शरीराच्या या अजब रचनेमागचं आहे डोकं चक्रावून टाकणारं लॉजिक
- Published by:Devika Shinde
Last Updated:
निसर्गाने मानवी शरीराची रचना करताना सर्व्हायव्हल आणि अचूकता या दोन गोष्टींना सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. चला तर मग, आपल्या शरीरातील या डबल सिस्टिममागचं रंजक विज्ञान समजून घेऊया.
advertisement
1/8

सकाळी उठल्यापासून आपण आरशात स्वतःचा चेहरा पाहतो. डोळे, कान, नाक ही सगळी अवयवांची मांडणी आपल्याला इतकी सवयीची झाली आहे की, आपण कधी विचारच करत नाही की हे असंच का आहे? कधी विचार केलाय का की, निसर्गाने आपल्याला दोन डोळे आणि दोन कानच का दिले? केवळ चेहरा बॅलन्स दिसण्यासाठी की यामागे काही विज्ञानाचं गुपित दडलंय?
advertisement
2/8
जर आपल्याला फक्त एकच डोळा किंवा एकच कान असता, तर आपलं आयुष्य आज आहे तसं सोपं राहिलं नसतं. निसर्गाने मानवी शरीराची रचना करताना सर्व्हायव्हल आणि अचूकता या दोन गोष्टींना सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. चला तर मग, आपल्या शरीरातील या डबल सिस्टिममागचं रंजक विज्ञान समजून घेऊया.
advertisement
3/8
दोन डोळ्यांची थ्री-डी ताकदआपले दोन्ही डोळे चेहऱ्यावर एकमेकांपासून थोड्या अंतरावर असतात. हे अंतर दिसायला छोटं असलं तरी त्याचं काम खूप मोठं आहे. जेव्हा आपण एखाद्या वस्तू कडे पाहतो, तेव्हा दोन्ही डोळे त्या वस्तूची थोडी वेगळी प्रतिमा टिपतात. त्यानंतर आपला मेंदू या दोन्ही प्रतिमा एकत्र करतो आणि आपल्याला वस्तूची खोली, अंतर आणि जाडी समजू लागते. विज्ञानाच्या भाषेत याला डेप्थ परसेप्शन म्हणतात.जर तुम्हाला फक्त एकच डोळा असता, तर समोरून येणारा चेंडू पकडणं, गाडी चालवणं किंवा पायऱ्या उतरणं हे अतिशय कठीण झालं असतं. कारण एका डोळ्याने आपल्याला अंतराचा अचूक अंदाज येत नाही.
advertisement
4/8
दोन कान: आवाजाचा GPSऐकणे म्हणजे केवळ आवाज ओळखणे नव्हे, तर तो आवाज नक्की कोणत्या दिशेने येतोय हे समजणे देखील महत्त्वाचे असते. आपले दोन कान आपल्या मेंदूसाठी 'लोकेशन ट्रॅकर'सारखं काम करतात.
advertisement
5/8
कसं चालतं हे गणित?जर तुमच्या उजव्या बाजूला कोणीतरी टाळी वाजवली, तर तो आवाज तुमच्या उजव्या कानापर्यंत डाव्या कानाच्या तुलनेत सेकंदाच्या काही हजारव्या भागात आधी पोहोचतो. तुमचा मेंदू या वेळेतील सूक्ष्म फरकाची लगेच तुलना करतो आणि तुम्हाला सांगतो की आवाज उजवीकडून आलाय. याला बायनॉरिकल हिअरिंग म्हणतात.
advertisement
6/8
दोन डोळे असल्यामुळे आपल्या बघण्याचा आवाका वाढतो. माणूस आपले डोके न हलवता साधारणपणे 180 अंशांपर्यंत पाहू शकतो. यामुळे आपल्याला आजूबाजूला काय घडतंय, याची जाणीव राहते. जर एकच डोळा असता, तर ही नजर खूपच मर्यादित झाला असता.
advertisement
7/8
निसर्गाची बॅकअप सिस्टिमनिसर्ग कधीच धोका पत्करत नाही. मानवी शरीरात दोन डोळे आणि दोन कान असणं हे एका बॅकअप सिस्टिमसारखं आहे. जर काही कारणास्तव एक डोळा किंवा एका कानाची क्षमता कमी झाली किंवा तो निकामी झाला, तरी दुसरा अवयव आपलं काम चालू ठेवतो. यामुळे माणूस पूर्णपणे अंध किंवा बहिरा होत नाही आणि तो जगाशी संपर्क साधू शकतो.
advertisement
8/8
आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव हा निसर्गाचा एक उत्कृष्ट इंजिनिअरिंग नमुना आहे. दोन डोळे आणि दोन कान म्हणजे केवळ दिसण्याची गोष्ट नाही, तर ती जगण्याची एक अत्याधुनिक यंत्रणा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
GK : दोन डोळे आणि दोन कानच का? मानवी शरीराच्या या अजब रचनेमागचं आहे डोकं चक्रावून टाकणारं लॉजिक