'धुरंधर' विसरा, पाकिस्तानात गेले 15 आठवडे नंबर 1 आहे 'ही' सीरिज; कालच रिलीज झालंय दुसरं सीझन, IMDb चं तगडं रेटिंग
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Top Trending Indian Series in Pakistan: फक्त धुरंधरच नाही, तर एक अशी भारतीय सीरिज आहे, जिला पाकिस्तानी जनतेने अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे.
advertisement
1/9

सध्या एका फिल्मने डंका वाजवला आहे, तो म्हणजे धुरंधर. पहिल्या भागाने तुफान कमाई केल्यानंतर आता फिल्मच्या दुसऱ्या भागानेही धुमाकूळ घातला आहे. ही फिल्म भारतामध्ये तुफान गाजतेय. मात्र, पाकिस्तान विरोधी फिल्म असल्याने पाकिस्तानात ही फिल्म बॅन करण्यात आलेली आहे.
advertisement
2/9
असं असूनही या फिल्मने पाकिस्तानी जनतेलाही वेड लावलं आहे आणि या देशातील लोक फिल्मची पायरेटेड कॉपी डाऊनलोड करण्यासाठी गर्दी करत आहेत. पण, फक्त धुरंधरच नाही, तर एक अशी भारतीय सीरिज आहे, जिला पाकिस्तानी जनतेने अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे.
advertisement
3/9
विशेष म्हणजे, ही सिरीज गेल्या १५ आठवड्यांपासून पाकिस्तानच्या 'टॉप १०' ट्रेंडिंग लिस्टमध्ये आपलं स्थान टिकवून आहे. ही सीरिज आहे अभिनेता रवी किशन यांची मुख्य भूमिका असलेली 'मामला लीगल है'.
advertisement
4/9
वकिली क्षेत्रातील मजेशीर आणि अतरंगी किस्से या सीरिजमध्ये अतिशय गमतीशीर पद्धतीने मांडले आहेत. केवळ भारतातच नाही, तर पाकिस्तानातही या सीरिजची क्रेझ पाहायला मिळतेय. २०२४ साली रिलीज झालेल्या या सीरिजला IMDb वर ८/१० असे जबरदस्त रेटिंग मिळाले आहेत.
advertisement
5/9
या कॉमेडी सीरिजमध्ये दिल्लीच्या पटपडगंज कोर्टातील वकिलांची धावपळ, त्यांचे जुगाड आणि कोर्टातील अत्यंत विनोदी प्रकरणं यात इतक्या छान पद्धतीने मांडली आहेत की प्रेक्षक पोट धरून हसतात.
advertisement
6/9
'मामला लीगल है' या सीरिजमध्ये रवी किशन यांच्यासोबत नैला ग्रेवाल, निधी बिष्ट, अनंत जोशी आणि अंजुम बत्रा या कलाकारांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या नेटफ्लिक्सवर सलग १५ आठवडे टॉप १० मध्ये राहणं ही मोठी गोष्ट मानली जात आहे.
advertisement
7/9
'मामला लीगल है' या सीरिजची लोकप्रियता पाहता निर्मात्यांनी या सीरिजचा दुसरा भाग तयार करण्याचा निर्णय घेतला. ३ एप्रिल २०२६ रोजी या सीरिजचा पार्ट २ नेटफ्लिक्सवर धडकला आहे. पहिलाच्या भागापेक्षाही दुसऱ्या भागातील प्रकरणं जास्त अतरंगी असणार यात शंका नाही.
advertisement
8/9
दुसऱ्या सीझनमध्ये 'उंदरांनी गांजा खाणे' आणि 'एका पोपटावर अश्लीलतेचा आरोप' अशा विचित्र पण सत्य वाटणाऱ्या केसेस सोडवण्यासाठी वकिलांची शक्ती पणाला लागणार आहे. यावेळी कुशा कपिला आणि भोजपुरी सुपरस्टार दिनेश लाल यादव (निरहुआ) हे देखील या सिरीजमध्ये दिसणार आहेत.
advertisement
9/9
केवळ 'मामला लीगल है'च नाही, तर इतरही काही भारतीय कंटेंट पाकिस्तानमध्ये सध्या टॉपवर आहेत. 'हॅलो बच्चों' ही सिरीज पाकिस्तानच्या लिस्टमध्ये ५ व्या क्रमांकावर असून तिचे IMDb रेटिंग ८.१ आहे. तर, 'तस्करी: द स्मगलर्स वेब' ही इम्रान हाश्मीची सिरीज गेल्या १० आठवड्यांपासून पाकिस्तानमध्ये ट्रेंड होत असून ती ६ व्या क्रमांकावर आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'धुरंधर' विसरा, पाकिस्तानात गेले 15 आठवडे नंबर 1 आहे 'ही' सीरिज; कालच रिलीज झालंय दुसरं सीझन, IMDb चं तगडं रेटिंग