TRENDING:

IPL 2026 : 4 वर्ष खेळतोय, पण विजयात 'झिरो' कॉन्ट्रिब्यूशन, मुंबईचा दिग्गज फक्त नावालाच स्टार!

Last Updated:
आयपीएल 2026 च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा केकेआरविरुद्ध विजय झाला, पण दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबईला पराभवाचा धक्का बसला आहे.
advertisement
1/9
4 वर्ष खेळतोय, पण विजयात 'झिरो' कॉन्ट्रिब्यूशन, मुंबईचा दिग्गज फक्त नावालाच स्टार!
दिल्लीविरुद्ध पहिले बॅटिंग करणाऱ्या मुंबईला 20 ओव्हरमध्ये फक्त 162 रन करता आले. सूर्यकुमार यादवच्या 51 आणि रोहित शर्माच्या 35 रन वगळता मुंबईच्या एकाही बॅटरला मोठी खेळी करता आली नाही.
advertisement
2/9
मुंबई इंडियन्स ही आयपीएल इतिहासातली सगळ्यात यशस्वी टीम आहे. मुंबईने आतापर्यंत सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे, पण 2020 नंतर मुंबईला एकदाही चॅम्पियन होता आलेलं नाही.
advertisement
3/9
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात मात्र मुंबईची टीम कागदावर सगळ्यात मजबूत दिसत आहे, तसंच अनेक माजी क्रिकेटपटूंनी मुंबई यंदा आयपीएल ट्रॉफी जिंकू शकते, असं भाकीतही वर्तवलं आहे.
advertisement
4/9
सहावी आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईसाठी मात्र दिग्गज खेळाडूची मागच्या 4 वर्षांमधली कामगिरी चिंताजनक आहे. या चार वर्षात 55 मॅच खेळल्यानंतरही या खेळाडूला एकही प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार मिळालेला नाही.
advertisement
5/9
सहावी आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईसाठी मात्र दिग्गज खेळाडूची मागच्या 4 वर्षांमधली कामगिरी चिंताजनक आहे. 2022 साली त्याने पदार्पण केलं, या चार वर्षात 55 मॅच खेळल्यानंतरही या खेळाडूला एकही प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार मिळालेला नाही.
advertisement
6/9
आयपीएलच्या 55 सामन्यांमध्ये त्याने 144.39 च्या स्ट्राईक रेटने आणि 37.05 च्या सरासरीने 1519 रन केल्या आहेत. आयपीएल करिअरमध्ये त्याची एकूण 8 अर्धशतकं आहेत, यातल्या 7 अर्धशतकांमध्ये मुंबईला पराभवाचा धक्का बसला. त्याने अर्धशतक केलं तेव्हा मुंबई फक्त एकदा जिंकली आहे.
advertisement
7/9
आयपीएल 2025 मध्ये दिल्लीविरुद्धच्या सामन्यातच त्याने 33 बॉलमध्ये 59 रन केले होते, या सामन्यात मुंबईला विजय मिळाला. याआधी केलेल्या सर्व 7 सामन्यांमध्ये मुंबईचा पराभव झाला.
advertisement
8/9
2022 साली आयपीएल पदार्पण केलेल्या तिलक वर्माचं हे मुंबईकडून खेळण्याचं पाचवं वर्ष आहे. मुंबई इंडियन्सने तिलक वर्माला यंदाच्या मोसमात 8 कोटी रुपयांना रिटेन केलं, पण 55 सामने आणि 4 वर्षांमध्ये तिलकला आयपीएलमध्ये एकदाही प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार मिळालेला नाही.
advertisement
9/9
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात तिलक वर्मा 2 बॉलमध्ये शून्य रनवर आऊट झाला, तर केकेआरविरुद्ध तिलक 14 बॉलमध्ये 20 रन करून माघारी परतला. मुंबईला यंदाच्या मोसमात चांगली कामगिरी करायची असेल, तर तिलकचा फॉर्म त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : 4 वर्ष खेळतोय, पण विजयात 'झिरो' कॉन्ट्रिब्यूशन, मुंबईचा दिग्गज फक्त नावालाच स्टार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल