TRENDING:

'आधी 100% काम देतो म्हणाला अन् नंतर मला...', सलमान खानवर बिग बॉस फेम अभिनेत्रीचे धक्कादायक आरोप, सांगताना ढसाढसा रडली

Last Updated:
गेली १६ वर्षे सलमान खान हा शो होस्ट करत असून यातील अनेक स्पर्धकांना त्याने त्यांच्या करिअरमध्ये मदत केली आहे. मात्र 'बिग बॉस २' ची लोकप्रिय स्पर्धक संभावना सेठला सलमानसोबत अतिशय विचित्र अनुभव आला.
advertisement
1/10
'आधी 100% काम देतो म्हणाला अन् नंतर मला...', सलमानवर अभिनेत्रीचे धक्कादायक आरोप
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. वरून जितका कठोर वाटतो, त्याहून जास्त तो मनाने कोमल आहे. आपल्या दबंग स्टाईलमुळे फेमस असलेल्या सलमानच्या मनात कोणी भरलं, तर तो त्याला रातोरात स्टार करतो.
advertisement
2/10
मात्र, नुकतंच एका मुलाखतीत एका प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमान खानवर खळबळजनक आरोप केले आहेत. यामध्ये तिने सलमान खानने तिला काम देण्याचं आश्वासन देऊन नंतर पाय काढून घेतल्याचा अनुभव सांगितला आहे.
advertisement
3/10
सलमान खान आणि बिग बॉस यांचं एक अतूट नातं आहे. गेली १६ वर्षे तो हा शो होस्ट करत असून यातील अनेक स्पर्धकांना सलमान खानने त्यांच्या करिअरमध्ये मदत केली आहे. मात्र 'बिग बॉस २' ची लोकप्रिय स्पर्धक संभावना सेठला सलमानसोबत अतिशय विचित्र अनुभव आला.
advertisement
4/10
बिग बॉसच्या चौथ्या सीझनमध्ये सलमान खानची एन्ट्री झाली. यावेळी आधीच्या तिन्ही सीझनमधील गाजलेल्या स्पर्धकांना डान्स परफॉर्मन्ससाठी बोलावण्यात आलं होतं. संभावना तिचा डान्स झाल्यानंतर एका कोपऱ्यात बसली होती. सगळे एकमेकांचं कौतुक करत होते, तेव्हा सलमान अचानक म्हणाला 'या मुलीने कमालच केली.' त्याच्या या वाक्याने संभावनाचा आनंद गगनात मावेनासा झाला.
advertisement
5/10
त्यानंतर अभिनेता रवी शंकर संभावनाला घेऊन सलमानकडे गेले. रवी यांनी संभावनाची अतिशय अभिमानाने ओळख करून दिली, "ही संभावना आहे, भोजपूरी फिल्म इंडस्ट्रीची शान!" तेव्हा सलमाननेही तिच्या डान्सचं कौतुक केलं.
advertisement
6/10
यावेळी संधीचा फायदा घेत संभावनानेही सलमानला विचारलं. "सर, जर तुम्हाला योग्य वाटलं तर मला एखाद्या फिल्ममध्ये..." यावर सलमान खानने मोठ्या मनाने उत्तर दिलं, "हो! १०० टक्के!" इतकंच नाही, तर त्याने संभावनाला आपला पर्सनल नंबरही दिला.
advertisement
7/10
स्टेजवरील कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा शूट सुरू झालं. बिग बॉसच्या टीमने संभावनाला सांगितलं की, तिला सलमानसमोर तसंच वागायचं आहे जशी ती बिग बॉसच्या घरात होती. संभावनाने मेकर्सचं ऐकलं आणि सलमानला त्याच स्टाईलमध्ये उत्तरं दिली. पण, कदाचित सलमानला तिची ती वागणूक आवडली नाही.
advertisement
8/10
शो संपल्यानंतर जेव्हा प्रत्यक्षात ती सलमानकडे काम मागायला गेली, तेव्हा तिला अतिशय धक्कादायक अनुभव आला. संभावनाला वाटलेलं की सलमानच्या शब्दानंतर तिचं करिअर सुसाट धावेल. फिल्म मिळाल्यावर ती घरी जाऊन आईवडिलांना सरप्राइज देणार होती. पण, तिचं हे स्वप्न झटक्यात तुटलं.
advertisement
9/10
संभावनाने जेव्हा सलमानला कामाबद्दल विचारलं, तेव्हा त्याने तिला अतिशय थंडपणे सांगितलं, "संभावना, तुला थोडं वजन कमी करावं लागेल आणि मी लोकांना प्रमोट करत नाही." मात्र, हे ऐकताच संभावनाच्या पायाखालची जमीनच सरकली.
advertisement
10/10
सलमानच्या या उत्तरामुळे तिचं स्वप्न उद्ध्वस्त झालं होतं. ती रडत रडत घरी परतली. या अनुभवाबद्दल बोलताना संभावना म्हणाली, "मला वाटतं सलमानजींना अशा मुली आवडत नाहीत ज्या थोडं चढून आणि बिनधास्त बोलतात. स्टेजवर जे घडलं ते स्क्रिप्टेड होतं, पण सलमानजींना ते कदाचित खटकलं."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'आधी 100% काम देतो म्हणाला अन् नंतर मला...', सलमान खानवर बिग बॉस फेम अभिनेत्रीचे धक्कादायक आरोप, सांगताना ढसाढसा रडली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल