TRENDING:

IPL 2026 : 23 वर्षांच्या पोरानं मुंबईला हरवलं, आता लखनऊ, चेन्नईला होतोय पश्चाताप, कोण आहे खेळाडू?

Last Updated:
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 162 धावा केल्या होत्या.या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने समीर रिझ्वी हा एकटा लढला आणि त्याने 90 धावांची वादळी खेळी करून संघाला सामना जिंकून दिला होता.
advertisement
1/9
 23 वर्षांच्या पोरानं मुंबईला हरवलं, आता लखनऊ, चेन्नईला होतोय पश्चाताप, कोण आहे खेळाडू?
आयपीलमध्ये आज डबल हेडरच्या पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा 6 विकेट राखून पराभव केला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या या विजयाचा शिल्पकार समीर रिझ्वी ठरला आहे. दरम्यान समीर रिझ्वी हा फक्त 23 वर्षाचा आहे.त्यामुळे मुंबई इंडियन्सला हरवणारा हा 23 वर्षीय खेळाडू कोण आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
2/9
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 162 धावा केल्या होत्या.या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने समीर रिझ्वी हा एकटा लढला आणि त्याने 90 धावांची वादळी खेळी करून संघाला सामना जिंकून दिला होता.
advertisement
3/9
6 डिसेंबर 2003 रोजी जन्मलेला समीर रिझवी हा मूळचा उत्तर प्रदेशचा खेळाडू आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो उत्तर प्रदेशकडून खेळतो. त्याच्या खेळण्याच्या शैलीमुळे आणि आक्रमकतेमुळे त्याला सोशल मीडियावर 'उजव्या हाताचा सुरेश रैना' म्हणून ओळखले जाते.
advertisement
4/9
समीरने वयाच्या 11 व्या वर्षी मेरठच्या गांधीबाग अकादमीतून क्रिकेटचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. त्याचे मामा तनकीब अख्तर यांनी त्याला प्रशिक्षण दिले. विशेष म्हणजे समीरने क्रिकेटकडे लक्ष द्यावे यासाठी त्याच्या मामाने समीरच्या वडिलांचा रोषही ओढवून घेतला होता, कारण त्यांना समीरने अभ्यासावर लक्ष द्यावे असे वाटत होते.
advertisement
5/9
समीरच्या संघर्षाचा काळ तेव्हा अधिक कठीण झाला जेव्हा 2020 मध्ये त्याच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाले. त्यानंतर वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी समीरच्या खांद्यावर आली.
advertisement
6/9
2011 मध्ये उत्तर प्रदेश आणि सौराष्ट्र यांच्यातील रणजी सामन्यादरम्यान अवघ्या 8 वर्षांच्या समीरने आपल्या फिल्डिंगने सुरेश रैनाचे लक्ष वेधून घेतले होते. रैना त्याच्या खेळावर इतका खूश झाला की त्याने समीरला स्वतःचा गॉगल भेट म्हणून दिला होता.
advertisement
7/9
2023 च्या यूपी टी-20 लीगमध्ये समीरने धुमाकूळ घातला होता. त्याने अवघ्या 47 चेंडूत शतक झळकावत संपूर्ण स्पर्धेत 455 धावा कुटल्या होत्या. त्याच्या या कामगिरीमुळे 2024 च्या आयपीएल लिलावात महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने (CSK) त्याच्यावर 8.40 कोटी रुपयांची मोठी बोली लावली होती. तसेच आयपीएल पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याचा कारनामा समीरने केला होता.
advertisement
8/9
2024च्या मोसमानंतर चेन्नईने त्याला रिलीज केले ज्याचा फायदा दिल्ली कॅपिटल्सने घेतला. 2025 च्या लिलावात दिल्लीने त्याला 95 लाखात आपल्या संघात सामील केले.
advertisement
9/9
लखनौ हे समीरचे होम ग्राऊंड आणि उत्तर प्रदेश त्याचा घरगुती संघ असूनही लखनौ सुपर जाएंट्सने लिलावात त्याच्यावर विश्वास दाखवला नव्हता. याचाच वचपा काढत समीरने लखनौविरुद्ध 70 धावांची तुफानी खेळी खेळली आणि आपल्याच 'होम टीम'ला पराभवाची धूळ चारली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : 23 वर्षांच्या पोरानं मुंबईला हरवलं, आता लखनऊ, चेन्नईला होतोय पश्चाताप, कोण आहे खेळाडू?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल