IPL 2026 : सूर्याची कॅप्टन्सीच नाही तर... मुंबईच्या पराभवाचे 5 व्हिलन, हातातली मॅच कुठे फिरली?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 मध्ये पहिला सामना जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सना दिल्लीविरुद्धच्या सामन्यात पराभवाचा धक्का बसला आहे. हार्दिक पांड्याच्या गैरहजेरीत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात मुंबई या सामन्यात मैदानात उतरली.
advertisement
1/7

दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकून या सामन्यात बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर मुंबईला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून फक्त 162 रनच करता आले. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या 51 आणि रोहित शर्माच्या 35 रन वगळता मुंबईचे सर्व बॅटर अपयशी ठरले.
advertisement
2/7
163 रनचं आव्हान रोखण्यासाठी आलेल्या मुंबईने उत्कृष्ट सुरूवात केली. 7 रनवरच दिल्लीने त्यांच्या 2 विकेट गमावल्या होत्या, पण त्यानंतर समीर रिझवी आणि पथुम निसांकाने मुंबईच्या बॉलिंगवर आक्रमण केलं.
advertisement
3/7
समीर रिझवीने 51 बॉलमध्ये 90 रनची खेळी केली, ज्यात 7 सिक्स आणि 7 फोरचा समावेश होता. तर पथुम निसांकाने 30 बॉलमध्ये 6 फोर आणि एका सिक्सच्या मदतीने 44 रन केले.
advertisement
4/7
दिल्लीच्या संथ खेळपट्टीवर मुंबई इंडियन्सने बॉलिंगमध्ये कमबॅक केलं होतं. 10 ओव्हरनंतर दिल्ली आणि मुंबईचा स्कोअर 73/3 असा एकसारखाच होता, पण 11 व्या आणि 12व्या ओव्हरमध्ये मॅचचा निकाल फिरला. इनिंगच्या 11 व्या ओव्हरला समीर रिझवीने कॉर्बिन बॉशच्या बॉलिंगवर 20 रन काढले, ज्यात दोन सिक्स आणि दोन फोरचा समावेश होता.
advertisement
5/7
यानंतर 12व्या ओव्हरमध्ये समीर रिझवीने मयंक मार्कंडेवर आक्रमण केलं. मयंक मार्कंडेच्या या ओव्हरला समीर रिझवीने दोन सिक्स मारल्या, या ओव्हरमध्ये मार्कंडेने 14 रन दिल्या.
advertisement
6/7
या सामन्यात मुंबई इंडियन्सना खराब फिल्डिंगचाही फटका बसला. मॅचच्या तिसऱ्याच ओव्हरला दीपक चहरने स्वत:च्याच बॉलिंगवर पथुम निसांकाचा कॅच सोडला. निसांकाचा कॅच सुटला तेव्हा तो 11 रनवर होता, पण त्याने 44 रनची खेळी केली.
advertisement
7/7
इनिंगच्या नवव्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला नमन धीरनेही निसांकाला जीवनदान दिलं, तेव्हा निसांका 42 रनवर खेळत होता. पुढच्या सामन्यांमध्ये विजय मिळवायचा असेल तर मुंबईला बॅटिंग आणि बॉलिंगसह त्यांची फिल्डिंगही सुधारावी लागणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : सूर्याची कॅप्टन्सीच नाही तर... मुंबईच्या पराभवाचे 5 व्हिलन, हातातली मॅच कुठे फिरली?