TRENDING:

IPL 2026 : टॉसआधीच मुंबईला धक्का, हार्दिक पांड्या टीमबाहेर, प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 बदल!

Last Updated:
आयपीएल 2026 चे पहिले डबल हेडर आज होत आहेत. डबल हेडरमधला पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे.
advertisement
1/9
टॉसआधीच मुंबईला धक्का, हार्दिक पांड्या टीमबाहेर, प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 बदल!
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खेळत नाहीये. हार्दिक पांड्याऐवजी सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे.
advertisement
2/9
आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी त्यांच्या स्पर्धेची सुरूवात विजयाने केली होती. मुंबईने केकेआरचा तर दिल्लीने लखनऊचा पराभव केला होता. आता दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून पॉईंट्स टेबलमध्ये नंबर वन होण्यासाठी दोन्ही टीम मैदानात उतरत आहेत.
advertisement
3/9
आयपीएल 2025 मध्ये सुरूवातीच्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सना पराभवाचा धक्का बसला होता, त्यानंतर दिल्लीविरुद्धच्या सामन्यापासूनच मुंबईच्या विजयाचा सिलसिला सुरू झाला आणि मुंबई प्ले-ऑफपर्यंत पोहोचली.
advertisement
4/9
दिल्लीविरुद्धच्या 2025 च्या सामन्यात मिचेल सॅन्टनरने करुण नायरला टाकलेला बॉल मुंबईसाठी टर्निंग पॉईंट ठरला होता. आयपीएल 2025 चा बॉल ऑफ द आयपीएल म्हणूनही या बॉलचा उल्लेख केला गेला.
advertisement
5/9
आता 2026 च्या आयपीएलमध्ये मिचेल सॅन्टनर दिल्लीविरुद्ध मैदानात उतरत आहे. केकेआरविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सॅन्टनर उपलब्ध नव्हता. या सामन्यात सॅन्टनर अल्लाह गझनफरऐवजी टीममध्ये आला आहे, त्यामुळे मुंबईची बॅटिंग आणखी मजबूत झाली आहे.
advertisement
6/9
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये पहिलाच सामना आहे, तसंच आम्ही मागचा सामनाही चेस करतानाच जिंकला, त्यामुळे आम्ही पहिले बॉलिंग करणार आहे, असं दिल्लीचा कॅप्टन अक्षर पटेल म्हणाला आहे.
advertisement
7/9
टॉस जिंकल्यानंतर आम्हीही बॅटिंगच घेणार होतो, असं मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला आहे. या सामन्यात मुंबईच्या टीममध्ये 3 बदल करण्यात आले आहेत. हार्दिक पांड्याऐवजी दीपक चहर, बोल्टऐवजी कॉर्बिन बॉश आणि अल्लाह गझनफरऐवजी मिचेल सॅन्टनरला संधी मिळाली आहे.
advertisement
8/9
मुंबईची प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा, रियान रिकलटन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, नमन धीर, शरफेन रदरफोर्ड, मिचेल सॅन्टनर, कॉर्बिन बॉश, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जसप्रीत बुमराह
advertisement
9/9
दिल्लीची प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल (विकेटकीपर), पथुम निसांका, नितीश राणा, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, विपराज निगम, लुंगी एनगिडी, कुलदीप यादव, टी नटराजन, मुकेश कुमार
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : टॉसआधीच मुंबईला धक्का, हार्दिक पांड्या टीमबाहेर, प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 बदल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल