Kamali Serial : कमळीला साइड कॅरेक्टर करा! मालिकेत तिची एन्ट्री होताच प्रेक्षक सुसाट; डायरेक्ट मेन हिरोईनला काढण्याची डिमांड
- Published by:Minal Gurav
Last Updated:
कमळी मालिकेत नव्या अभिनेत्रीची एन्ट्री होताच प्रेक्षकांनी कमळीचा पत्ता कट केला आहे. कमळीला साइड कॅरेक्टर करण्याची मागणी होत आहे.
advertisement
1/9

मराठी टेलिव्हिजनवर सध्या अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर दुसरीकडे काही मालिकांनी आपला चांगलाच जम बसवला आहे. टीआरपी चार्टमध्ये या मालिका आता अव्वल स्थानवर आहेत.
advertisement
2/9
अशीच एक मालिका म्हणजे कमळी. झी मराठीवरची कमळी ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. झी मराठीच्या मालिकांमध्ये कमळी ही सर्वाधिक टिआरपी मिळवणारी मालिका आहे.
advertisement
3/9
कमळी या मालिकेची मेन हिरोईन आहे. पण आता मालिकेत एका नव्या हिरोईनची एन्ट्री झाली आहे. नव्या अभिनेत्रीला पाहताच प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
advertisement
4/9
नव्या अभिनेत्री एन्ट्री होताच कमळीला साइड कॅरेक्टर करा अशी मागणी प्रेक्षकांकडून होत आहे. नेमकी ही हिरोईन आहे कोण? ज्यामुळे कमळीला साइड कॅरेक्टर करा अशी डिमांड होत आहे.
advertisement
5/9
कमळी मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात ऋषीच्या आयुष्यात अनामिकाची एन्ट्री झाली आहे. अनामिकाच्या येण्याने एका नव्या कहाणीची सुरूवात होणार आहे. अनामिका ऋषीच्या कॉलेजमध्ये अनामिका म्युझिक टिचर म्हणून जॉइन झाली आहे.
advertisement
6/9
गायिका आर्या आंबेकरची कमळी मालिकेत एन्ट्री झाली आहे. ती सध्या काय करते या सिनेमानंतर आर्या पुन्हा अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांसमोर आली आहे. आर्या तिच्या गाण्यामुळे प्रेक्षकांवर राज्य करतेय. त्यात ती आता रोज मालिकेत दिसणार म्हटल्यावर प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
advertisement
7/9
मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षकांनी थोडक्यात कमळीचा पत्ता कट केला आहे. एका युझरनं कमेंट करत लिहिलंय, "माझी फव्हरेट आर्या. आर्याला मेन लीड बनला. कमळीला साइड कॅरेक्टर करा."
advertisement
8/9
दुसऱ्या युझरनं लिहिलंय, "आम्हाला लीड रोलमध्ये बघायचं आहे. कमळीपेक्षा खपू छान आहे."
advertisement
9/9
आणखी एकानं लिहिलंय, "काही नाही,आत मालिके त ट्रेण्ड आला आहे ,विन ही तुटेना या मालिकेत महेश काळे सरांना आणले होते, कमळी आणि ऋषीच आहेत एकमेकांसाठी"
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Kamali Serial : कमळीला साइड कॅरेक्टर करा! मालिकेत तिची एन्ट्री होताच प्रेक्षक सुसाट; डायरेक्ट मेन हिरोईनला काढण्याची डिमांड