TRENDING:

ए.आ.रहमानची आवडती गायिका, गायली 10,000 गाणी; वयाच्या 34 व्या वर्षी चटका लावणारी एक्झिट, हळहळली होती इंडस्ट्री

Last Updated:
संगीतकार ए आर रहमान यांची आवडती गायिका. जिनं 10,000 हून अधिक गाणी गायली. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला.
advertisement
1/8
ए.आ.रहमानची आवडती गायिका, वयाच्या 34 व्या वर्षी चटका लावणारी एक्झिट; हळहळली होती इंडस्ट्री
मनोरंजन विश्वात असे अनेक तारे होऊन गेले आहेत ज्यांनी तरुण वयात प्रचंड प्रसिद्धी मिळवली आणि त्याच वयात त्यांचे निधनही झाले.
advertisement
2/8
इतकंच नाही तर ऑस्कर-विजेते गायक आणि संगीतकार ए. आर. रहमान यांनीही त्यांची प्रशंसा केली आहे.  स्वर्णलता ही त्यांची आवडती गायिका होती असं म्हणतात. दुर्दैवानं स्वर्णलता यांचं वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी निधन झाले.
advertisement
3/8
स्वर्णलता हे हिंदी आणि दक्षिण भारतीय संगीत उद्योगातील एक सुप्रसिद्ध नाव होतं. 12 सप्टेंबर 2010 रोजी त्यांचं निधन झालं. आपल्या कारकिर्दीत त्यांनी हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि बंगालीसह जवळपास 10 भाषांमध्ये 10,000  हून अधिक गाणी गायली.
advertisement
4/8
स्वर्णलता यांनी दक्षिण भारतीय चित्रपटांसाठी सर्वाधिक गाणी गायली असली तरी हिंदी संगीतप्रेमींमध्ये त्यांची लोकप्रियता कायम राहिली. 'नीतिक्कू थंडनाई' या चित्रपटात के. जे. येसुदास यांच्यासोबत 'चिन्नचिरू किलिये' हे प्रसिद्ध गाणे गायल्यानंतर स्वर्णलता प्रकाशझोतात आल्या. यानंतर स्वर्णलता घराघरात पोहोचल्या. त्यांनी अगदी लहान वयातच संगीत क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं.
advertisement
5/8
इतकंच नाही तर ऑस्कर-विजेते गायक आणि संगीतकार ए. आर. रहमान यांनीही त्यांची प्रशंसा केली आहे.  स्वर्णलता ही त्यांची आवडती गायिका होती असं म्हणतात. दुर्दैवानं स्वर्णलता यांचं वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी निधन झाले.
advertisement
6/8
1973 मध्ये केरळमध्ये जन्मलेल्या स्वर्णलता यांना फुफ्फुसाचा एका रेअर गंभीर आजार होता. त्या आजाराशी त्यांची झुंज अपयशी ठरली त्यांच्या मृत्यूच्या बातमीने जगभरातील त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. 
advertisement
7/8
संपूर्ण जग स्वर्णलता यांच्या गाण्यांनी मोहित झाले होते. स्वर्णतला यांनी हिंदी गाणी खूप कमी गायली पण जी गायली ती प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. उर्मिला मातोंडकरचं 'हाय रामा ये क्या हुआ' हे गाणं स्वर्णलता यांनी गायलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी अनेक गाण्यांमध्ये हमिंग केलं आहे जे ऐकणाऱ्या प्रत्येकाला मंत्रमुग्ध करतं.
advertisement
8/8
2004 साली मुघल ए आजम हा सिनेमा कलर करून पुन्हा रिलीज करण्यात आला होता तेव्हा सिनेमाच्या आयकॉनिक गाण्याचे तमिळ वर्जन स्वर्णलता यांनी गायले होते.  'करुथ्थम्मा' चित्रपटातील 'पोराले पोन्नुथाई' या गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ए.आ.रहमानची आवडती गायिका, गायली 10,000 गाणी; वयाच्या 34 व्या वर्षी चटका लावणारी एक्झिट, हळहळली होती इंडस्ट्री
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल