चेहऱ्यावर वारंवार मुरुम येण्याचं सर्वात सामान्य कारण म्हणजे त्वचेची छिद्रं बंद होणं. याविषयी त्वचारोगतज्ज्ञ डॉ. नीहारिका गोयल यांंनी सांगितलेला सल्ला नक्की वापरुन पाहायला हवा. दिनचर्येत स्वच्छतेच्या काही सवयींचा समावेश केला तर ही समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते.
Blood Pressure : मीठ बदलल्यानं रक्तदाब नियंत्रित होतो का ? salt substitutes म्हणजे काय ?
advertisement
त्वचेची खोलवर स्वच्छता करण्यासाठी काही सोप्या पद्धती त्यांनी सांगितल्यात.
त्वचा स्वच्छ ठेवण्याची पहिली पायरी म्हणजे चेहरा व्यवस्थित धुणं. दिवसातून दोनदा सौम्य फेस वॉश वापरा. यामुळे दिवसभरात चेहऱ्यावर साचलेली धूळ, अतिरिक्त तेल आणि घाण सहजपणे निघून जाते. पण, चेहरा जास्त धुणार नाही याची काळजी घ्या, कारण यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होऊन त्वचा कोरडी होऊ शकते. यासाठी संतुलन राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
योग्य उत्पादनांची निवड - त्वचा तेलकट असेल, तर त्वचेसाठीची उत्पादनं काळजीपूर्वक निवडली पाहिजेत. त्वचेची छिद्रं बंद होऊ नयेत म्हणून नेहमी ऑईल फ्री किंवा नॉन-कॉमेडोजेनिक उत्पादनांचा वापर करा. याव्यतिरिक्त, मेकअप करत असाल, तर झोपण्यापूर्वी पूर्णपणे आणि व्यवस्थित काढून टाका. मेकअप तसाच ठेवल्यानं त्वचेच्या छिद्रांमधे घाण साचू शकते आणि त्यामुळे मुरुम येऊ शकतात.
सौम्य स्क्रब - चेहऱ्याच्या खोलवर स्वच्छतेसाठी, आठवड्यातून एकदा किंवा दोनदा सौम्य स्क्रब करणं खूप फायदेशीर ठरतं. स्क्रबिंगमुळे मृत त्वचा निघून जाते आणि त्वचेची छिद्रं स्वच्छ राहतात. पण, खूप जोरात किंवा कठोरपणे स्क्रब करू नका, कारण त्यामुळे त्वचेला इजा होऊ शकते.
आहार आणि पाणी पिण्याचं प्रमाण - शरीराची बाह्य काळजी घेणं जितकं महत्त्वाचं , तितकंच आतून पोषण करणंही महत्त्वाचं आहे. दिवसभर भरपूर पाणी प्या आणि आहारात ताजी फळं आणि भाज्यांचा समावेश करून संतुलित आहार घ्या. तळलेले पदार्थ आणि जंक फूड शक्यतो टाळा, कारण या पदार्थांमुळे चेहऱ्यावरील मुरुमं अधिक वाढू शकतात.
स्वच्छता आणि सनस्क्रीनचा वापर - नेहमी टॉवेल आणि उशांचे अभ्रे स्वच्छ आहेत ना याची खात्री करा. वारंवार हातांनी चेहऱ्याला स्पर्श करणं टाळा, कारण यामुळे हातांवरील घाण चेहऱ्यावर येते.
याव्यतिरिक्त, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी दररोज सनस्क्रीन लावायला विसरू नका.
