TRENDING:

नागपूर पुणे वंदे भारतला हिरवा झेंडा, बुकिंग ते तिकीट दर, सगळी माहिती एका क्लिकवर

Last Updated:
नागपूर: राज्याची उपराजधानी नागपूर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे या दोन्ही शहरांदरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे. आज (10 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अजनी (नागपूर) ते पुणे या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे.
advertisement
1/5
नागपूर पुणे वंदे भारतला हिरवा झेंडा, बुकिंग ते तिकीट दर, सगळी माहिती एका क्लिकवर
नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा लोकार्पण सोहळा पार पडला असून रेल्वे प्रशासनाने तिकीट बुकिंग सुविधा सुरू केली आहे. प्रवासी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने तिकीट बूक करू शकतील.
advertisement
2/5
नागपूर ते पुणे: चेअर सीटसाठी 2140 रुपये तर एक्झिक्युटिव्ह सीटसाठी 3815 रुपये तिकीट ठेवण्यात आलं आहे.
advertisement
3/5
अहिल्यानगर ते पुणे: चेअर सीटसाठी 508 रुपये तर एक्झिक्युटिव्ह सीटसाठी 819 रुपये तिकीट आहे. जर प्रवासादरम्यान नाश्ता आणि जेवणाची सुविधा घ्यायची असेल तर चेअर सीटसाठी 750 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह सीटसाठी 1279 रुपये मोजावे लागतील.
advertisement
4/5
अहिल्यानगर ते नागपूर: चेअर सीटसाठी 1410 रुपये तर एक्झिक्युटिव्ह सीटसाठी 2867 रुपये तिकीट आहे. अहिल्यानगर ते नागपूर प्रवासादरम्यान नाश्ता आणि जेवणाची सुविधा घ्यायची असेल तर चेअर सीटसाठी 1735 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह सीटसाठी 3815 रुपये तिकीट आहे.
advertisement
5/5
वंदे भारत एक्सप्रेसमुळे पुणे-नागपूर दरम्यानचा प्रवास आता अधिक जलद आणि आरामदायक होणार आहे. सध्या इतर एक्सप्रेस गाड्यांना या प्रवासासाठी सुमारे 15 तास लागतात. मात्र वंदे भारत एक्सप्रेस केवळ 12 तासांत हे अंतर पार करणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
नागपूर पुणे वंदे भारतला हिरवा झेंडा, बुकिंग ते तिकीट दर, सगळी माहिती एका क्लिकवर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल