TRENDING:

कोल्हापूर महापालिकेवर इतिहासात पहिल्यांदाच महायुतीची सत्ता, महाडिक-क्षीरसागर गुलालात न्हाऊन निघाले

Last Updated:
कोल्हापूर महापौर व उप-महापौरपदाच्या निवडणुकीत रुपाराणी निकम आणि अक्षय जरग यांना ४६ मते पडली.
advertisement
1/5
कोल्हापूर महापालिकेवर इतिहासात पहिल्यांदाच महायुतीची सत्ता, नेते गुलालात न्हाले
कोल्हापूर महापालिकेवर इतिहासात पहिल्यांदाच महायुतीची सत्ता आली असून भाजपचा महापौर तर जनसुराज्य पक्षाला महापौर पद मिळाले आहे.
advertisement
2/5
भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका रूपाराणी निकम यांची महापौरपदी तर जनसुराज्य शक्ती पक्षाचे नगरसेवक अक्षय विक्रम जरग यांची उपमहापौरपदी निवड झाली. या निवडीनंतर महापालिकेसमोर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी जल्लोष सुरू केला.
advertisement
3/5
छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, जय श्रीराम अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. कार्यकर्ते पदाधिकारी गुलालात न्हाऊन निघाले.
advertisement
4/5
या जल्लोषामध्ये खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, युथ आयकॉन कृष्णराज महाडिक, महापौर निकम यांचे पती संग्राम निकम, उपमहापौर अक्षय यांचे वडील विक्रम जरग यांच्यासह भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व जनसुराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले.
advertisement
5/5
महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत रुपाराणी निकम आणि अक्षय जरग यांना ४६ मते पडली. काँग्रेस आघाडीचे महापौर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार अनुक्रमे सुनील शेंडे आणि दुर्वास कदम यांना प्रत्येकी २५ मते पडली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
कोल्हापूर महापालिकेवर इतिहासात पहिल्यांदाच महायुतीची सत्ता, महाडिक-क्षीरसागर गुलालात न्हाऊन निघाले
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल