TRENDING:

अधिकमासात दर्शनासाठी भाविकांची शेगावच्या गजानन महाराज मंदिरात प्रचंड गर्दी, पाहा PHOTOS

Last Updated:
रोज हजारो भक्त भारतातील कानाकोपऱ्यातून या क्षेत्री येतात आणि परम पावन समाधीचे दर्शन घेतात. सध्या सुरु असलेल्या अधिकमासात या ठिकाणी भक्तांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे.
advertisement
1/7
अधिकमासात दर्शनासाठी भाविकांची गजानन महाराज मंदिरात प्रचंड गर्दी, पाहा PHOTOS
श्री संत गजानन महाराजांच्या वास्तव्याने परम पावन झालेले विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात श्री क्षेत्र शेगाव आहे. रोज हजारो भक्त भारतातील कानाकोपऱ्यातून या क्षेत्री येतात आणि परम पावन समाधीचे दर्शन घेतात. सध्या सुरु असलेल्या अधिकमासात या ठिकाणी भक्तांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे.
advertisement
2/7
अधिक मास हा मल मास किंवा अपवित्र मास म्हणूनही ओळखला जातो. या मासामध्ये शुभ कार्य केले जात नाही आणि म्हणूनच लाखोंच्या संख्येने भक्त तीर्थस्थळाकडे धाव घेतात. तीर्थस्थळी जाऊन देवाचे दर्शन घेतल्याने आणि दानधर्म केल्याने विशेष पुण्य मिळते असं म्हणतात. त्यामुळे श्री संत गजानन महाराजांच्या शेगाव नगरीमध्ये मंदिरात भक्तांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे.
advertisement
3/7
सकाळपासून ते रात्री पर्यंत मंदिरात दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. गजानन महाराजांच्या मंदिरात असलेली कमालीची शांतता आणि स्वच्छता अनेकांना हवीहवीशी वाटते आणि भक्त या ठिकाणी आल्यानंतर बाहेर पडू इच्छित नाही. सध्याच्या अधिकमासात भजनी कीर्तनामुळे सायंकाळी अधिकच रम्य आणि भक्तिमय वातावरण आहे.
advertisement
4/7
शेगाव रेल्वे स्टेशन वरून मंदिर काहीच अंतरावर आहे रेल्वे स्टेशन ते गजानन महाराजांच्या मंदिरापर्यंत देवस्थानाच्या वतीनेच भक्तांच्या सेवेकरिता मोफत बस उपलब्ध आहेत. रेल्वे स्टेशन वर उभ्या असलेल्या देवस्थानाच्या बसमध्ये भक्त चढतात आणि या बसमधून मंदिरापर्यंत पोहोचतात. त्यानंतर फ्रेश होण्याची उत्तम व्यवस्थाही त्या ठिकाणी आहे.
advertisement
5/7
पादत्राणे सुरक्षित ठेवण्यासाठी देवस्थानच्या वतीने सोय करण्यात आली आहे त्यानंतर थेट मंदिरात दर्शनासाठी रांगेत लागावे. दर्शनासाठी गर्दीनुसार किती वेळ लागेल हे त्या ठिकाणी डिजिटली सांगितलं जातं. अधिकमासामुळे भक्तांना दर्शनासाठी तीन ते साडेतीन तासांचा वेळ लागतोय.
advertisement
6/7
गजानन महाराजांचे दर्शनासाठी रोज शेकडो भाविक येतात. मात्र अधिक महिन्यांमध्ये भक्तांची लाखोंच्या संख्येने गर्दी बघायला मिळते सर्व भक्तांकरिता मंदिरात महाप्रसादाची सोय सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत सुरू असते.
advertisement
7/7
अधिकमासात शेगाव नगरीत भक्तांची प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे अनेक जण या ठिकाणी विश्रामासाठी भक्त निवासाची व्यवस्था करण्यासाठी देखील भक्तांना तास दोन तास वेटिंग वर राहावे लागते आहे. एकंदरीत अधिक मासामुळे शेगाव नगरी भक्तांनी दुमदुमली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/ वर्धा/
अधिकमासात दर्शनासाठी भाविकांची शेगावच्या गजानन महाराज मंदिरात प्रचंड गर्दी, पाहा PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल