Mumbai Indians Scenario : दिल्लीने आरबीसीचा रस्ता अडवला, मुंबईचा 'टांगा पलटी', MI साठी कसं असेल Playoffs चं समीकरण!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
WPL 2026 Points table : विमेन्स प्रीमियर लीग 2026 मधील 15 व्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सने अत्यंत शानदार परफॉर्मन्स देत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला 7 विकेट्सनी पराभूत केलं. या जबरदस्त विजयामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या टीमला महत्त्वाचे 2 पॉइंट्स मिळाले आहे.
advertisement
1/7

दिल्लीच्या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. या निकालामुळे स्पर्धेतील चुरस आता अधिकच वाढली असून आगामी मॅचेस अधिक रोमांचक होण्याची चिन्हे दिसत आहेत.
advertisement
2/7
आरसीबीला धूळ चारल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या खात्यात आता एकूण 6 पॉइंट्स जमा झाले आहेत. या विजयापूर्वी दिल्लीची टीम चौथ्या नंबरवर होती, मात्र आता त्यांनी थेट झेप घेत दुसरं स्थान काबीज केलं आहे.
advertisement
3/7
दिल्लीच्या या प्रगतीमुळे दुसऱ्या क्रमांकावर असलेली गुजरात जायंट्सची टीम आता तिसऱ्या पायरीवर फेकली गेली आहे, तर मुंबई इंडियन्सची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
advertisement
4/7
पॉइंट्स टेबलचा सध्याचा विचार करता, मुंबई इंडियन्स 4 पॉइंट्ससह चौथ्या क्रमांकावर असल्याने हरमनप्रीतच्या अडचणी वाढल्या आहेत. पलटणला आता उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.
advertisement
5/7
मुंबई इंडियन्स 4 पॉइंट्ससह चौथ्या आणि युपी वॉरियर्स 4 पॉइंट्ससह पाचव्या नंबरवर संघर्ष करत आहेत. दिल्लीविरुद्धच्या या पराभवाचा आरसीबीला मात्र फारसा फटका बसलेला नाही, कारण ते अजूनही 10 पॉइंट्ससह टॉपवर कायम आहेत.
advertisement
6/7
वुमेन्स प्रीमियर लीगचा हा सीझन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून प्रत्येक टीम टॉप 3 मध्ये राहण्यासाठी धडपडत आहे. दिल्लीने मिळवलेल्या या विजयामुळे आता गुजरात आणि मुंबई यांसारख्या मोठ्या टीम्सवर दडपण वाढले आहे.
advertisement
7/7
दरम्यान, येणाऱ्या पुढील मॅचेसमध्ये रनरेटची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार असून चाहत्यांना हाय-व्होल्टेज क्रिकेट पाहायला मिळणार आहे. तर मुंबईसाठी प्लेऑफची शर्यत संपल्यात जमा झालीये का? असा सवाल विचारला जातोय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Mumbai Indians Scenario : दिल्लीने आरबीसीचा रस्ता अडवला, मुंबईचा 'टांगा पलटी', MI साठी कसं असेल Playoffs चं समीकरण!