अनाथ मुलांनी 'सुखकर्त्या'साठी केली खास तयारी, सजावट पाहून कराल कौतुक, Photos
- Published by:Aaditi Datar
Last Updated:
देशात गणेशोत्सवाची धूम सुरू असताना वर्ध्यातील अनाथाश्रमातील मुलांनी खास तयारी केलीय. गणरायासाठी बनवलेल्या सजावटीला मोठी मागणी आहे.
advertisement
1/9

सध्या देशभर गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. आपल्या लाडक्या बाप्पासाठी सर्वजण खास सजावट करतात. यंदा वर्धा येथील अनाथाश्रमातील मुलांनी तयार केलेल्या सजावटीचे वर्धाकरांना खास आकर्षण आहे.
advertisement
2/9
सामाजिक कार्यकर्ते शिवाजी चौधरी यांनी वर्धा येथे अनाथाश्रम सुरू केलं. या स्नेहालय आश्रमात सध्या 65 मुले आहेत.
advertisement
3/9
गणेशोत्सवासाठी स्नेहालयातील 20-25 मुलांनी मिळून सजावटीचं आकर्षक साहित्य तयार केलं. ही सजावट सर्वांना आकर्षित करत आहे. केवळ एक आठवड्यात 100 पेक्षा जास्त सेटअप खरेदी करून वर्धेकरांनी या अनाथ मुलांना मदतीचा हातही दिला आहे.
advertisement
4/9
अनाथ मुलांना केवळ आसरा देण्याऐवजी अभ्यासासोबतच त्यांच्या हातच्या कलेला वाव देण्याची भूमिकाही अनाथालयानं घेतली. याच उद्देशाने सुरू केलेला उपक्रम विद्यार्थ्यांना चांगला रोजगारही मिळवून देत आहे.
advertisement
5/9
वर्धा येथील मेन रोडवर असलेल्या एलआयसी कार्यालयाच्या बाजूला समाज सेवी सुशील दीक्षित यांनी मोफत दुकान लावण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे आश्रमसेविंसह आश्रमातील विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.
advertisement
6/9
आजकाल आर्टिफिशियल डेकोरेशनकडे नागरिकांचा कल दिसून येतोय. त्यामुळे इव्हेंट मॅनेजर मयुरी चौधरी यांनी गणेश सेटअप बनविण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांना मनुष्यबळाची गरज होती. त्यांनी हेच काम गरजूंना दिल्यास त्यांना चांगला फायदा होईल हा विचार करून आश्रमातील विद्यार्थ्यांना निवडलं.
advertisement
7/9
आश्रमाशी जुडलेल्या मयुरी यांनी विद्यार्थ्यांना कच्चा माल पुरवला. यात लोखंड मटेरियल, साचा, फर, फूल, बेल्स आदींची खरेदी करून मुलांना दिली. त्यानंतर मुलांनी आपल्या कलेतून हे आकर्षक डेकोरेशन सेटअप तयार केले.
advertisement
8/9
या सेटअपच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यामधील 30 टक्के पैसे हे अनाथ आश्रमाच्या मुलांसाठी दिली जाणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोक हे खरेदी करण्यासाठी प्राधान्य देताना दिसून येत आहेत.
advertisement
9/9
या सेटअपची किंमत 1700 रुपयांपासून ते 4500 रुपयांपर्यंत आहे. मात्र तरीही या सजावटीतील मुलांची कला नागरिकांना खरेदीसाठी भाग पाडत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/ वर्धा/
अनाथ मुलांनी 'सुखकर्त्या'साठी केली खास तयारी, सजावट पाहून कराल कौतुक, Photos