TRENDING:

आधार कार्डची फोटोकॉपी वापरत असाल तर सावधान! UIDAI करणार मोठा बदल

Last Updated:
UIDAI New Update: अनेक वर्षांपासून, ओळखपत्र आवश्यक असलेल्या ठिकाणी आधारची फोटोकॉपी देणे ही एक सामान्य गोष्ट झालीये. हॉटेल्स, मोबाईल स्टोअर्स, ऑफिसेस आणि कार्यक्रम ही अशी ठिकाणे होती जिथे लोक आधारची कॉपी मागायचे.
advertisement
1/8
आधार कार्डची फोटोकॉपी वापरत असाल तर सावधान! UIDAI करणार मोठा बदल
UIDAI New Update: भारतात आधार कार्ड हे ओळखीचा पुरावा म्हणून वापरलं जातं. प्रत्येक भारतीयाकडे आधार कार्ड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून, ओळखपत्र आवश्यक असलेल्या ठिकाणी आधारची फोटोकॉपी देणे ही एक सामान्य गोष्ट झालीये. हॉटेल्स, मोबाईल स्टोअर्स, ऑफिसेस आणि कार्यक्रम ही अशी ठिकाणे होती जिथे लोक आधारची फोटोकॉपी मागायचे.
advertisement
2/8
ही प्रोसेस एवढी कॉमन झाली होती की ती तिकीट दाखवल्यासारखं वाटायचं. पण आता ही जुनी सवय संपणार आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, UIDAI एक नवीन नियम तयार करतंय जो भौतिक आधार फोटोकॉपींचे संग्रहण आणि साठवणूक बंद करेल. हा बदल देशभरातील संपूर्ण ओळख पडताळणी प्रणालीमध्ये बदल घडवून आणू शकतो.
advertisement
3/8
फोटोकॉपी बंदीचे खरे कारण : आधार क्रमांक ही अत्यंत संवेदनशील माहिती आहे आणि आधार नंबरच्या लाखो फोटोकॉपी विविध ठिकाणी - हॉटेलच्या ड्रॉवरमध्ये, स्टोअर फाइल कॅबिनेटमध्ये किंवा ऑफिस स्टोरेज रूममध्ये - कोणत्याही सुरक्षेशिवाय पडून आहेत. या मोठ्या प्रमाणात कागदी प्रती प्रायव्हसीसाठी एक मोठा धोका निर्माण करतात.
advertisement
4/8
UIDAI चा उद्देश हा ढिसाळ प्रणाली संपवणे आणि तुमची पर्सनल माहिती चुकीच्या हातात जाण्यापासून रोखणे आहे. म्हणूनच, कागदी प्रतींवर अवलंबून राहण्याऐवजी डिजिटल, सुरक्षित आणि जलद व्हेरिफिकेशनकडे लक्ष केंद्रित केले जात आहे.
advertisement
5/8
ओळख आता QR कोडद्वारे केली जाईल : प्रत्येक आधार कार्डवरील लहान QR कोड हा एक खरा गेम-चेंजर आहे. या कोडमध्ये तुमची मूलभूत आणि एन्क्रिप्टेड माहिती असते. जी तुमचा पूर्ण आधार नंबर उघड न करता तुमची ओळख त्वरित पडताळण्यासाठी स्कॅन केली जाऊ शकते.
advertisement
6/8
ही पद्धत केवळ सुरक्षित नाही तर फोटोकॉपीपेक्षा गैरवापर होण्याची शक्यता कमी आहे. UIDAI एक अॅप देखील विकसित करत आहे जे व्यवसायांना इंटरनेट किंवा डेटाबेस कनेक्शनशिवाय आधार व्हेरिफिकेशन करण्यास अनुमती देईल. याचा अर्थ असा की हॉटेल चेक-इन देखील फक्त एका स्कॅनने पूर्ण करता येतात.
advertisement
7/8
UIDAI कडे रजिस्ट्रेशन आवश्यक : आता, आधार व्हेरेफिकेशन करू इच्छिणाऱ्या कोणत्याही संस्थेला, मग ती हॉटेल, टेलिकॉम कंपनी, बँक किंवा इव्हेंट ऑर्गनायजर असो, UIDAI कडे नोंदणी करावी लागेल. नोंदणीनंतरच ते नवीन QR-आधारित टूल्स वापरू शकतील. यामुळे ओळख पडताळणी प्रक्रिया देशभरात एकसमान, सुरक्षित आणि ट्रॅक करण्यायोग्य होईल.
advertisement
8/8
हा नियम लवकरच लागू केला जाईल : UIDAI च्या सीईओंच्या मते, नवीन नियम मंजूर झाला आहे आणि लवकरच तो अधिसूचित केला जाईल. हे स्पष्टपणे दर्शवते की ओळख पडताळणीची जुनी पद्धत आता संपणार आहे. यूझर्ससाठी, याचा अर्थ कमी कागदपत्रे, कमी धोका आणि अधिक सुरक्षितता. संस्थांसाठी, ही आधुनिक आणि विश्वासार्ह प्रणालीचा भाग बनण्याची संधी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
आधार कार्डची फोटोकॉपी वापरत असाल तर सावधान! UIDAI करणार मोठा बदल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल